Pune : पुण्यात गुरुवारी या भागात असणार पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज – कात्रज कोंढवा रस्ता राजस सोसायटी चौक (Pune) व कात्रज चौक येथील मुख्य पाण्याच्या लाईनची दुरुस्ती तसेच पद्मावती पंपिंग स्टेशन येथील मुख्य पाण्याच्या लाईनची दुरुस्ती कामासाठी व फ्लो मीटर बसविणे ही दुरुस्ती कामे असल्याने येत्या गुरुवारी (दि.27) पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

यामध्ये कात्रज व कोंढवा बु., राजीव गांधीनगर, अप्पर, सुपर इंदिरानगर, धनकवडी, संभाजीनगर, बिबवेवाडी परीसराचा समावेश असणार आहे. तर शुक्रवारी (दि.28) उशिरा कमी दाबाने पाणी येणार आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग –

1. कात्रज कोंढवा बु., अप्पर इंदिरानगर परिसर कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, गुजरवाडी रोड, बरखडेनगर, उत्कर्ष, राजस, भूषण, इंद्रप्रस्थ सोसायटी, माऊली नगर, विद्या नगर, आनंद नगर सुखसागर (Pune) नगर भाग-1 व 2 शिवशंभो नगर, गोकुळनगर, साईनगर, गजानन नगर, काकडे वस्ती, ग्रीन पार्क, राजीव गांधीनगर व अप्पर इंदिरानगरचा काही भाग, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकर नगर, कोंढवा बुद्रुक गाव, लक्ष्मीनगर, सोमजी बस स्टॉप परिसर, पुण्यधाम आश्रम रस्ता, साई सर्व्हिस, पारगे नगर, खडीमशीन परिसर, येवलेवाडी, कामठे-पाटील नगर

MPC News Special : अक्षय तृतीया निमित्त पिंपरी-चिंचवडकरांनी केली एक हजार 150 वाहनांची खरेदी

2 तळजाई, धनकवडी, बिबवेवाडी परिसर तळजाई वसाहत व पद्मावती परिसर, संभाजीनगर, धनकवडी, गुलाबनगर चैतन्यनगर परिसर, काशिनाथ पाटील नगर, लोअर इंदिरानगर, अप्पर व सुपर इंदिरानगर, चिंतामणीनगर, स्टेट बैंक नगर, लेक टाऊन सोसायटी, महालक्ष्मीनगर, पुनम गार्डन परिसर, दामोदर सोसायटी, महेश सोसायटी, मनमोहन पार्क, ओम अभिषेक सोसायटी, नीलकमल सोसायटी, मानस सोसायटी, इ. परिसर याचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.