Pune: कोरोना रोखण्यासाठी 3 महिन्यांत विना निविदा केलेल्या खर्चाची माहिती द्या – विशाल तांबे

Pune: disclose expenses without tenders in the last 3 months to prevent corona - Vishal Tambe

एमपीसी न्यूज – मागील 3 महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विषयक विना निविदा ज्या खरेदी केल्या, त्याची सविस्तर माहिती  जून महिन्यात होणाऱ्या मुख्य सभेत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे यांनी केली आहे.

त्यासंबंधीचे पत्र महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना देण्यात आले आहे. मार्च 2020 पासून पुणे शहारत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकार आणि पुणे महापालिका यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना युध्द पातळीवर करून आजार आटोक्यात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
या कोरोना काळात दिनांक 15 मार्च ते दिनांक 31 मे 2020 या कालावधीत मुख्यसभा आणि स्थायी समिती या दोन्ही सभा घेणे शक्य झाले नाही. या काळात प्रशासकीय सोयीसाठी आणि पुणे शहराकरिता मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांबाबत खरेदी करावी लागली. त्यामुळे गेल्या 3 महिन्यांतील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्यविषयक विना निविदा ज्या खरेदी केल्या, त्याची सविस्तर विषयपत्र येणाऱ्या जून महिन्याच्या मुख्य सभेपुढे ठेवावे, असे तांबे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.