Pune : स्त्री कर्तुत्ववान आदिशक्ती पुरस्काराचे वितरण;महिला आर्थिक सक्षमीकरण व्याख्यानाला चांगला प्रतिसाद 

एमपीसी न्यूज   – महिला मुक्ती दिनानिमित्त कुसुमवत्सल संस्था आणि चार्ट कमांडो आयोजित, (Pune )’वाह! इंडिया’ मुव्हमेंट अंतर्गत महिला आर्थिक सक्षमीकरण करिता, “आर्थिक स्वातंत्र्य कशासाठी, का आणि कसे? यावर वक्ते महेश पाटील यांचे व्याख्यान श्रमिक पत्रकार संघ, नवी पेठ, पुणे येथे संपन्न झाले.
 वाह! इंडिया मुव्हमेंट, अंतर्गत महिला आर्थिक सक्षमीकरणाचा (Pune )उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून महिलांना आर्थिक ज्ञान दिले जाते.

Pune: वारजेत सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी

 महिलांमध्ये शिस्त, संयम असल्यामुळे त्या लवकर आर्थिक सक्षम होऊ शकतात. या प्रसंगी माजी महापौर दीप्ती चौधरी,सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीजा मस्के, धनंजय मोहिते, डॉक्टर राजेंद्र भवाळकर, सामाजिक कार्यकर्ते शामराव मानकर, महेश पाटील, राजाभाऊ नखाते, सुनीता बांदल, दुर्गा शुक्रे, मनीषा समर्थ, प्रकाश शिंदे, विजय जगदाळे, प्रकाश गरुड, मीनल पवार, रुपाली निवदेकर, विद्या कोतवाल, सुविधा नाईक, मनीषा गिरमे, अंजली चव्हाण, स्वाती हिरवे, कुसुमवत्सल संस्थेच्या वैशाली पाटील आदी मान्यवर तसेच पदाधिकारी व श्रोता वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमा प्रसंगी स्त्री कर्तुत्ववान आदिशक्ती पुरस्काराने पोलीस पाटील शारदा दातीर, ऍड. वृषाली सूर्यवंशी, कॉन्स्टेबल सीमा वळवी,ऍड. नेहा जांभळे सपकाळ, सरपंच छाया सपकाळ, उद्योजक आरती निढाळकर यांना सन्मानित करण्यात आले.
त्याच बरोबर कुसुमवत्सल संस्थेच्या ब्रँड अँबेसिडर म्हणून नेत्रा नागपुरे, रूपाली अभंग, चांदणी तांदळे, ज्योती कुंभार, अर्चना कल्याणी यांची निवड करण्यात आली.मनोरंजन उपस्थितीत कुसुमवत्सल संचालित स्त्रीशक्ती महिला मंचाची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून महिलां सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली अभंग व अंजली चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन कुसूमवत्सल संस्थेच्या संचालिका वैशाली पाटील यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.