Pune: वारजेत सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज – मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वारजे भागातील (Pune)भुयारी मार्ग परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे साताऱ्याकडे एक मार्गिका 2 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहे.
त्याचा परिणाम आज सायंकाळी वारजेत झाला. सर्वच रस्त्यांवर अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. डुक्कर खिंड रोजरी जवळ हायवे वर काम चालू असून  निम्मा रस्ता बंद केला आहे. त्यामुळे वाहतूक सर्व्हिस रस्त्यावर आली आहे.

पोलीस रस्त्यावरूनच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होते.  (Pune) मुख्य रस्ताच अडवला गेल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. पुढील 15 दिवस या रस्त्याचे काम चालू राहील असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
कामावरून घरी जाणाऱ्यांची संख्या सायंकाळी मोठ्या प्रमाणात असते. त्यांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. वारजेतील सर्वच रस्ते जाम होते. त्यामुळे तासनतास वाहतूक कोंडीतच गेले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.