Pune District Crime News: दुधाच्या कॅनमधून ताडीची वाहतूक करणाऱ्याला अटक

एमपीसीन्यूज : पोलिसांना चकमा देण्यासाठी दुधाच्या कॅनमध्ये ताडी टाकून त्याची वाहतूक करण्याचा प्रयत्न ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने हाणून पाडला. याप्रकरणी प्रकाश शामराव भंडारी (वय.32 रा. रणगाव, ता.इंदापूर जि.पुणे) याला अटक करण्यात आली असून पाच लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

पुणे – सोलापूर महामार्गवरील कुुरकुंभ याठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक पीकअप व्हॅन संशयास्पद अवस्थेत जाताना दिसली.

पोलिसांनी ही पीकअप गाडी थांबवून तिची तपासणी केली असता त्यातील दुधाच्या कॅनमध्ये ताडी असल्याचे आढळून आले. अशाप्रकारे तो चोरून दुधाच्या कॅनमध्ये ताडीची वाहतूक करताना आढळला.

पोलिसांनी त्याच्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पीकअप गाडी, पाच दुधाचे कॅन असा एकूण 5 लाख 14 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरोधात मुंबई दारूबंदी अधिनियम कायदा कलम 65(ई), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील कारवाईसाठी आरोपी व मुद्देमाल दौंड पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.