Pune : डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेतून कायद्याचे राज्य निर्माण केले – प्रा. प्रकाश पवार

एमपीसी न्यूज – रक्ताचा एक थेंबही न सांडता आणि हिंसेला (Pune) कुठेही स्थान न देता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्षांची गुलामगिरी संपुष्टात आणली. भारतातील प्रत्येक माणसाला जगण्याचा समान अधिकार व मूलभूत हक्कांचे स्वातंत्र्य लोकशाहीच्या माध्यमातून बहाल केले आणि ते अबाधित ठेवण्यासाठी राज्यघटनेतून कायद्याचे राज्य निर्माण केले असे प्रतिपादन ज्येष्ठ वक्ते व फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रकाश मारूती पवार यांनी शुक्रवारी (दि.14) केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरण व महापारेषणमधील उत्सव समितीच्या वतीने रास्तापेठ येथे आयोजित कार्यक्रमात प्रा. प्रकाश पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापारेषणचे मुख्य अभियंता राजेंद्र गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार तर व्यासपीठावर अधीक्षक अभियंता सर्वश्री सतीश राजदीप, सतीश गायकवाड, जयवंत कुलकर्णी, प्रमोद भोसले यांची उपस्थिती होती.

प्रा. प्रकाश पवार म्हणाले की, ‘भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने भारताची एक प्रजासत्ताक व सार्वभौम राष्ट्र म्हणून उभारणी केली. समता प्रस्थापित केली. धर्म, पंथ, जातीपातीला थारा न देता आम्ही सर्व भारताचे लोक अशी प्रत्येकास नवी ओळख दिली. प्रत्येकास समान अधिकार व हक्क दिले.’ यावेळी मुख्य अभियंता राजेंद्र पवार म्हणाले, की ‘भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या ज्ञानसंपन्नतेच्या जोरावरच भारताचा आर्थिक व सामाजिक (Pune) विकास झाला आहे.

Bhosari : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तरुणाला अटक

प्रगती झाली आहे. विविध क्षेत्रातील उत्तुंग भरारीसाठी योग्य दिशा मिळाली आहे. त्यांच्यामुळेच तळागाळातील सर्वसामान्य माणूस मानसिक गुलामगिरीतून मुक्त झाला आहे.’ डॉ. आंबेडकर यांनी विविध क्षेत्राचे अभ्यासक व तज्ज्ञ म्हणून देश उभारणीत दिलेल्या ऐतिहासिक योगदानाची माहिती यावेळी मुख्य अभियंता पवार यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब शिंदे यांनी केले तर भरत मुंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महावितरण व महापारेषणचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजनासाठी सर्व कर्मचारी संघटनांच्या संयुक्त उत्सव समितीने पुढाकार घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.