Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भीमथॉन स्पर्धा उत्साहात पार

एमपीसी न्यूज – डॉ. आंबेडकर यांचे विचार समाजातील (Pune) सर्व घटकापर्यंत पोहचवण्यासाठी तसेच सामाजिक एकता आणि समानतेचा संदेश देणार्‍या मॅरेथॉनच्या धर्तीवर शुक्रवारी (दि.14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भिमथॉनचे आयोजन करण्यात आले होते. 7 किलोमीटर अंतर असलेली ही स्पर्धा सारसबाग जवळील सणस मैदानापासून सुरु होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन येथे समारोप झाला.

 

या मॅरेथॉनला पुणे जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष अभय छाजेड, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, पीएमटीचे माजी अध्यक्ष सुधीर काळे आदी उपस्थित होते.

Pune : डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेतून कायद्याचे राज्य निर्माण केले – प्रा. प्रकाश पवार

भिमथॉन स्पर्धेतील पुरुष गटात पहिला येण्याचा मान विकास पोळ यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक दीपक कुंभार व तृतिय क्रमांक इमताज मोंदल यांना मिळाला. 18 वर्षाखालील गटात संदीप यादव, प्रताप कदम आणि आदित्य पायाळ विजयी ठरले.

महिला खुल्या गटात रोहिणी टिळक, रुषिका कुळे व अर्पिता शिंदे विजयी ठरल्या. 18 वर्षाखालील युवती गटात निशा पासवान, देवकी आणि रिया धावरे यांनी विजयाचा मान पटकावला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमथॉन स्पर्धेचे आयोजन स्पार्क फाउंडेशनचे किशोर कंबळे, माय अर्थ फाउंडेशचे (Pune)  अध्यक्ष अनंत घरत यांनी केले.

महिला, पुरुष व 18 वर्षाखालील युवा गटात लढत झाली. मोठ्या संख्येने नागरिकांनी या स्पर्धेत भाग घेतला व मॅरेथॉनची शोभा वाढवली. विजेत्यांना ट्रॉफी सर्टिफिकेट व मेडल देण्यात आले व सर्व स्पर्धकांना सर्टिफिकेट आणि मेडल देण्यात आले. तर, सूत्रसंचालन ऍड. आकाश साबळे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.