IPL 2023 : हाय स्कोरिंग सामन्यामध्ये हैदराबादचे नवाब कोलकातावर भारी; हॅरी ब्रूकचे नाबाद शतक

एमपीसी न्यूज – शनिवारी 14 एप्रिल रोजी (IPL 2023) झालेल्या सामन्यामध्ये सनरायझर्स हैदराबादनी कोलकाता नाईट रायडर्सला 23 धावांनी हरवले. हैदराबाद आणि कोलकाता या दोन्ही संघांनी स्वतःचे चार पैकी दोन सामने जिंकले आहेत. दोन्हीही संघ कागदावर चांगले आढळून दिसत असले तरी वास्तव सामन्यांमध्ये त्यांच्यात काही कमजोरी दिसून येते. ईडन गार्डन्स या कोलकाताच्या घरेलू मैदानामध्ये केकेआरने नाणेफेक जिंकून पहिला गोलंदाज करायचा निर्णय घेतला.

सनरायझर्स हैदराबादकडून फलंदाजी करताना मयंक अगरवाल (9 धावा) आणि राहुल त्रिपाठी (9 धावा) हे काही जास्त वेळ टिकले नाही. परंतु, मयंकचा सलामीवीर जोडीदार हॅरी ब्रुक (100 धावा) याने उत्कृष्ट कामगिरी करत फक्त 55 चेंडूंमध्ये तीन आकडी धावसंख्या पूर्ण केली.

हैदराबादचा कर्णधार एडन मार्करम आणि अभिषेक शर्मा या दोघांच्या परिपूर्ण खेळीमुळे हैदराबादची धाव संख्या 200 च्या पुढे गेली. हेनरीच क्लासेन याच्या उत्तम कॅमिओमुळे हैदराबाद 228 चा विशाल लक्षापर्यंत पोहोचली. कोलकाताचे गोलंदाज काही जास्त चालले नाही. वेस्ट इंडियन अष्टपैलू आंद्रे रसल याने तीन बळी घेतले, तर भारतीय फिरकी गोलंदाज वरून चक्रवर्ती याने एक बळी घेतला.

Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भीमथॉन स्पर्धा उत्साहात पार

229 या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताचा (IPL 2023) सलामी वीर फलंदाज रहमनुल्लाह गुरबाज (0 धावा) हा स्वतःचे खाते न उघडताच बाद झाला. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेला व्यंकटेश अय्यरही (10 धावा) काही जास्त वेळ टिकला नाही. ‘पिंच हिटर’ म्हणून आलेला सुनील नरेन (0 धावा) हाही खाते न उघडताच बाद झाला.

परंतु, सलामीवीर फलंदाज नारायण जगदीशन (36 धावा), कर्णधार नितीश राणा (75 धावा) आणि मागच्या सामन्याचा स्टार रिंकू सिंग (58) या तिघांमुळे कोलकाता 200 च्या आकड्यापर्यंत तरी पोहोचली. हैदराबादकडून गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमार, नटराजन आणि उमरान मलिक या तिघांनी प्रत्येकी एक बळी घेतला. मार्को जन्सेन आणि मयंक मार्कंडे या दोघांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

कोलकाताचा संघ यांच्याकडे चांगले वेगवान गोलंदाज असले तरीही ते धावसंख्येला नियंत्रित ठेवू शकत नाहीत.  त्यावरून श्रेयस अय्यर हा अनुपस्थित असल्यामुळे कर्णधार पदाची जबाबदारी नितेश राणा याला दिली आहे. नितेश रानाकडे आयपीएलच्या कर्णधार पदाचा जास्त अनुभव नाही.

परंतु, रिंकू सिंग सारख्या आत्मविश्वासी खेळाडूची कर्णधार नितीश राणाला नक्कीच मदत होईल. हैदराबादकडून ब्रुक याच्या शतकामुळे हैदराबादचे फलंदाजी परत सक्षम दिसत आहे. यंदाची आयपीएल अत्यंत स्पर्धात्मक असल्यामुळे मार्जिन ऑफ एरर फार कमी आहे. कुठल्याही संघाला आपण आता आयपीएल ट्रॉफी उचलण्याचा मानकरी कोण असेल याचा अंदाज लावू शकत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.