Pune : अखेर ड्रग्ज माफिया ललित पाटील याला चेन्नईतून अटक

एमपीसी न्यूज – पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून (Pune) गेलेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटील याला चेन्नई येथून अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ललितला ताब्यात घेतले आहे.

2 ऑक्टोबरला ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयातून (Pune)पळून गेला होता. पुणे तसेच मुंबई व नाशिक पोलिसांची दहा पथके ललितचा शोध घेत होते. अखेर तो चेन्नई येथे सापडला.

Mahavitran : क्रीडा स्पर्धेत महावितरणच्या संघास सर्वसाधारण विजेतेपद

ललित याला पुण्यात आणण्यात  येणार असून न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे.

ललित पाटील हा पोलिसांच्या हाती लागल्याने या ड्रग्ज प्रकरणातील अनेक लोकांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

ललित पाटीलला रुग्णालयात सर्व सुविधा पुरवल्या जात होत्या. हे उघड झाल्यानंतर राजकीय पक्षांनी एकमेकांना लक्ष केले होते. आता ललितला पाडल्यामुळे तो कोण आहे,
त्याला रूग्णालयात सुविधा कोण पुरवत होते, तो तिथून ड्रग्ज रॅकेट कस चालवत होता, याचा उलगडा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ललितला काही दिवसांपूर्वी पहिल्यांदा पुणे जिल्ह्यातील चाकण भागात ड्रग्ज तस्करी करतांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यांनतर येरवडा कारागृहात ठेवले होते.
कारागृहातील कर्मचा़ऱ्यांच्या मदतीने पोटाचा विकार असल्याचा बनाव रचून तो ससून रूग्णालयात तीन महिन्यांपूर्वी दाखल झाला होता. तेथून तो हे रॅकेट चालवायचा.

पोलिसांना याची माहिती मिळताच सापळा रचून त्यांनी दोन कोटीचे अंमली पदार्थ जप्त केले. यात हे ड्रग्ज रॅकेट उघड झाले, मात्र ललित रुग्णालयातून पळून गेला होता. अखेर पोलिसांनी त्याला चेन्नई येथे पकडले असून, न्यायालयात हजर करणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.