Mahavitran : क्रीडा स्पर्धेत महावितरणच्या संघास सर्वसाधारण विजेतेपद

एमपीसी न्यूज – पंजाबमधील पटियाला येथे नुकतेच संपन्न (Mahavitran)झालेल्या 45 व्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या मैदानी स्पर्धेत महावितरणच्या संघास सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. त्याबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले आहे.

13 व 14ऑक्टोबर या कालावधीत पंजाबातील पटियाला शहरात आयोजित अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या मैदानी स्पर्धेत महावितरणच्या संघाने एकूण पाच सुवर्ण, 3 रौप्य व 4 कांस्य पदके पटकावली. या स्पर्धेचे आयोजन पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लि. यांनी केले होते.

PCMC : शहरातील व्यावसायिक इमारतींचे अग्निप्रतिबंधात्मक सर्वेक्षण

या स्पर्धेत महावितरणच्या गुलाबसिंग वसावे यांनी 100 मीटर, 200 मीटर धावणे व 400 मीटर अडथळा(Mahavitran)स्पर्धेत 3 सुवर्ण पदके पटकावली तर सचिन चव्हाण यांनी भाला फेक व प्रवीण बोरावके यांनी गोळा फेक या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

धावण्याच्या 4×100 रिले स्पर्धेत गुलाबसिंग वसावे, संभाजी जाधव, साईनाथ मसने व शुभम निंबाळकर यांनी रौप्यपदक प्राप्त केले. त्याचप्रमाणे धावण्याच्या 4x 400 रिले स्पर्धेत गुलाबसिंग वसावे, विजय भारे, शुभम निंबाळकर व प्रदीप वंजारी यांनी रौप्यपदक प्राप्त केले. तसेच विजय भारे यांनी 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले.

या स्पर्धेत हनमंत कदम यांनी हातोडा फेक स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त केले तर साईनाथ मसने यांनी 110 मीटर अडथळा स्पर्धेत, हनमंत कदम यांनी गोळाफेक, साईनाथ मसने यांनी 100 मीटर धावणे व सोमनाथ कंठीकर यांनी लांब उडी या स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले. या स्पर्धेत महावितरणचा 17 सदस्यीय संघ सहभागी झाला होता. संघाचे प्रशिक्षक म्हणून प्रतिक वाईकर तर संघ व्यवस्थापक म्हणून उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे यांनी काम पाहिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.