Pune Drug : धक्कादायक! पुणे बनत आहे अंमली पदार्थांचे हॉटस्पॉट???

एमपीसी न्यूज : गेल्या काही दिवसांपासून (Pune Drug) पुण्यातील अनेक भाग अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी हॉटस्पॉट ठरत आहेत. पोलिसांकडून मागील 10 महिन्यांच्या कारवाईत 3 कोटीहून अधिक रक्कमेचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक युनिट 1 ने गेल्या काही महिन्यांपासून अंमली पदार्थाची विक्री तसेच सेवन करणाऱ्यांवर कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. 

पुण्यातील उच्चभ्रू भाग म्हणून प्रसिद्ध असलेले बाणेर, हिंजवडी, उंड्री, कोंढवा या भागात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी पुणे शहरात अनेक प्रकल्प सुरू आहेत. यासाठी कामगारांची संख्या मोठी आहे. या वर्गाकडून देखील अमली पदार्थांचा वापर केला जातो. बड्या कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर असणारे व्यक्ती, आयटी इंजिनीअर तसेच उच्चशिक्षित तरुणांकडून या पदार्थांचे सेवन केले जात आहे, हे तपासातून समोर आले आहे.

Marathi Press Conference : पिंपरी चिंचवडमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन

1 जानेवारीपासून 11 नोव्हेंबरपर्यंत पुढील साठा जप्त करण्यात आला –  Pune Drug

गांजा: 63 लाख रुपयांचा 311 किलो गांजा जप्त

मेफेड्रोन (एमडी): 1 कोटी 76 लाख रुपयांचे एमडी जप्त

अफिम: 9 लाख 91 हजार रुपयांचे अफिम ताब्यात

कोकेन: 38 लाख 34 हजार रुपयांचे कोकेन जप्त

आफु: 4 लाख 92 हजार रुपयांची 38 किलो अफुची बोंडे

ब्राऊन शुगर: 58000 हजार रुपयांची पावडर जप्त

गेल्या 10 महिन्यात पोलिसांनी 76 आरोपींना बेड्या ठोकल्या असून यांचे जाळे लवकरच उधळले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.