Pune : ‘पिफ’मध्ये जगभराचे जगणे मांडणारे चित्रपट

एमपीसी न्यूज – इराण, अरब जगत आणि भारतातील विविध प्रदेशातील माणसे आणि त्यांचा ( Pune) जगण्यासाठी चाललेला संघर्ष मांडणारे चित्रपट ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर झाले.

‘टेरेस्ट्रियल व्हर्सेस’ हा इराणचा चित्रपट. इराणची राजधानी तेहरानमध्ये लादलेल्या सांस्कृतिक आणि धार्मिक नियंत्रणातही सकारात्मक भावनेने आणि दृढनिश्चयाने मार्गक्रमण करणाऱ्या सर्वसामान्यांच्या गोष्टी या चित्रपटात सादर करण्यात आल्या आहेत. सन २०२२ मध्ये ड्रेस कोड कायद्याचा निषेध करण्यासाठी देशातील महिला एकत्र आल्याच्या काळात या चित्रपटाची निर्मिती झालेली आहे. चित्रपट प्रदर्शीत झाल्यावर दिग्दर्शक अली असगरी म्हणाले, की इराणमध्ये स्वतंत्र चित्रकर्मी आपले चित्रपट मुक्तपणे दाखवू शकत नाहीत. भारतीय दर्शक चित्रपटांवर प्रेम करतात आणि म्हणून ते जगभरातील इतर प्रेक्षकांपेक्षा वेगळे आहे.

‘जगण्याची माफक इच्छा’

जगणं सोप्पं की मरण? मरण. खरंच. जगताना अशक्य त्रास होतो. मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात. एकटं वाटत राहतं. दुःख हे सुखापेक्षा वरचढ होत जातं. आणि हे सगळं फक्त जगण्याच्या माफक इच्छेमुळे सहन करत राहावं लागतं. आणि ती इच्छा आपल्याला काठोरातील कठोर निर्णय घ्यायला पात्र ठरवत राहते. ‘थडवू’ तो कठोर निर्णय घेण्याची गोष्ट आपल्याला सांगतो.

चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर बोलताना दिग्दर्शक, फाझिल रझाक म्हणाले, “”थडवू’ हा माणसाच्या भावना दाखव ( Pune) ण्याचा माझा प्रयत्न आहे. आयुष्याचे वेगवेगळे स्तर मी या चित्रपटाद्वारे दाखवू इच्छितो.”

“केरळ मध्ये वैद्यकीय उपचारांसाठी बरीच लोकं स्वेच्छेने तुरुंगाकडे वळत असल्याच्या बातम्या सतत माझ्या डोळ्यासमोर येत होत्या. या विषयाबद्दल आपण काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटत होतं. मग त्यावर एक गोष्ट मी रचत गेलो आणि थडवू हा सिनेमा घडवला.” असं रझाक म्हणाले.

“लोकांनी एकमेकांबद्दल संवेदनशील बनले पाहिजे”

“लोकांनी एकमेकांशी दयाळूपणे वागावे, अशी माझी इच्छा आहे. एकमेकांवर तसेच स्वतःवर प्रेम करावे आणि एकमेकांना क्षमा करायला हवे,” असे अभिनेत्री मारी किटिया म्हणाल्या. त्यांचा अभिनय असलेला ‘सिटीझन सेंट’ हा चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला. त्यानिमित्ताने त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, “हा चित्रपट एखाद्या बोधकथेसारखा आहे. त्यात अनेक प्रतीके आणि वेगवेगळी दृश्ये आहेत. हे क्षमा, प्रेम, विश्वास, स्वतःवर प्रेम करण्यास आणि क्षमा करण्यास सक्षम असण्याबद्दल आहे.

हा चित्रपट टिनाटिन कजरीश्विली यांनी दिग्दर्शित केला आहे. ही कथा फिरते ती एका क्रॉस (वधस्तंभ) भोवती. खाणकाम सुरू असलेल्या एका छोट्या गावात एक क्रॉस उभा असतो, ज्याला स्थानिक कामगार आपला संरक्षक मानत असतात. क्रॉसच्या दुरुस्तीच्या कामासाठी तो एका संग्रहालयात ठेवला असता त्यावरील संताचा पुतळा अचानक गायब होतो. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्यामध्ये एक अनोळखी, रहस्यमयी माणुस प्रवेश करतो. लोक त्यालाच संत मानायला लागतात, पण लगेच त्यांची निराशा होते. एक सामान्य माणूस त्यांचा संरक्षक असू शकत नाही, तो वधस्तंभावरच जास्त सामर्थ्यशाली असतो अशी त्यांची धारणा बनते. म्हणून सगळे लोक त्या व्यक्तीला पुन्हा वधस्तंभावर लटकवतात.

‘स्वातंत्र्याच्या गैरवापराचा मुद्दा’

“इदिमुझक्कम’ चित्रपटाचे प्रदर्शन झाल्यावर राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सीनू रामासामी आणि अभिनेते जी. व्ही. प्रकाश यांनी संवाद साधला. रामास्वामी म्हणाले, की हा चित्रपट जगातील स्वातंत्र्याच्या गैरवापराच्या मुद्द्यावर आहे. जिथे आपण निरपराधमुलांवर समाजातील एक वर्ग स्वतःच्या स्वार्थासाठी खोटे आरोप लावतो आणि स्वातंत्र्याचा गैरवापर करतो.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.