Pune : शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथे घराला आग; तिघांचा होरपळून मृत्यू

एमपीसी न्यूज – शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावातील भिल्ल वस्तीतील घराला लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

ही घटना आज दुपारी 3.30 घडली आहे.  लालू अनंता गावडे (34), दादू लालू गावडे (वय 2) आणि प्रांजल अरुण पवार (वय 2) अशी मृत झालेल्याची नावे आहेत. परंतु आग कशाने लागली हे अद्याप समजू शकले नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी, शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावातील भिल्ल वस्तीमध्ये गावडे कुटुंब 15 वर्षांपासून राहत आहे. त्यांच्या घरावर उसाचे पाचट टाकले होते. घरी पत्नी स्वयंपाक करत असताना ही आग लागली, यात बापलेक आणि एक मुलगी या तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे, असे पोलिसांनी सांगतिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.