Maval / Shirur : संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मावळमध्ये 58.21 टक्के तर शिरूरमध्ये 58.35 टक्के मतदान

एमपीसी न्यूज- मावळ आणि शिरूर मतदारसंघात झालेल्या मतदानाबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे मतदानाची वेळ संपेपर्यंत मावळमध्ये 58.21  टक्के तर शिरूरमध्ये 58.35 टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी अजून प्राप्त झालेली नाही.

आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या वेळात अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र उन्हाची तीव्रता वाढू लागताच मतदानाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. मात्र संध्याकाळी 5 नंतर पुन्हा मतदानासाठी गर्दी झाल्याचे चित्र काही मतदान केंद्रावर पाहायला मिळाले.  प्राप्त झालेल्या माहितीनुसार मावळ मतदारसंघातून उरण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 61.80 टक्के मतदानाची नोंद झाली तर शिरूरमधून आंबेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 67 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघ 58.21 %

पनवेल 55.30 %
कर्जत 60.40 %
उरण 61.80 %
मावळ 61.28 %
चिंचवड 57.30 %
पिंपरी 56.30 %

शिरूर लोकसभा मतदारसंघ 58.35 %
जुन्नर 61.00 %
आंबेगाव 67 %
खेड 59 %
शिरूर 60 %
भोसरी 54 %
हडपसर 54 %

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.