Pimpri : उत्साही वातावरणात नवमतदारांनी केले मतदान; नवमतदारांचा ‘हाऊ इज द जोश…’

एमपीसी न्यूज – मतदान राष्ट्रीय कर्तव्य आहे, हे लक्षात घेऊन अनेक नवमतदारांनी उत्साहाने मतदान केले. शहरातील विविध मतदान केंद्रांवर नवमतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. 
प्रथमच मतदानाचे कर्तव्य पार पाडणारा कुशल ढोकरे म्हणाला, ” मतदान करताना खूप चांगले वाटले. खूप उत्सुकता होती. आजवर आईवडिलांच्या किंवा मोठय़ांच्या बोटावर शाई पाहिली होती. त्या शाईचा मी हकदार झालो ही भावना खूप सुखद आहे. मतदान करतांना जो राज्याचा सर्वागीण विकास घडवून आणेल, अशा व्यक्तीची आपण निवड केली. या शिवाय मतदान केल्यानंतर मित्र परिवार तसेच कॉलनीतील लोकांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले” ‘व्होट फॉर बेटर महाराष्ट्र’च्या दृष्टीने माझे मतदान आहे असे तो म्हणाला.
  • देवांगी चोवाटिया (पिंपरी) – मतदानाची उत्सुकता होती मतदान न करता सरकारवर कोणतेही आरोप करु नका. मतदान करण्यासाठी युवकांनी बाहेर पडणे गरजेचे आहे.

दक्षा धुकलड  (चिंचवड) – मतदान राष्ट्रीय कर्तव्य आहे, हे लक्षात घेऊन अनेक नवमतदारांनी उत्साहाने मतदान केले. शहरातील विविध मतदान केंद्रांवर नवमतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विकास होण्यासाठी नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर मतदानास बाहेर पडणे गरजेचे आहे.
  • हर्षदा भापकर (पिंपरी) – मतदान केल्याचा आनंद होत आहे. राष्ट्रीय उत्सव आहे. त्याचा हक्क सगळ्यांनी बजावा असे आवाहन तिने केले.
आकांक्षा इनामदार (तळेगाव दाभाडे) – आज प्रथमच मतदान केल्याचा अभिमान वाटतो. यापुढे देखील प्रत्येक निवडणुकीला मतदान करणारच शिवाय सगळ्यांनाच मतदान करण्याचे आवाहन करणार.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.