Pune : माजी राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील यांची प्रकृती अत्यवस्थ, पुण्यात उपचार चालू

एमपीसी न्यूज – देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची ( Pune) तब्येत बिघडल्याने त्यांना बुधवारी (दि.13) तातडीने उपचारासाठी पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या डॉक्टरांकडून प्रतिभाताई पाटील यांच्यावर उपचार सुरू आहे.

Mahavitran : महावितरणच्या पुण्यातील दोन उपकेंद्रांना ‘आयएसओ’चे मानांकन

 

गेल्या काही दिवसांपासून प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती बरी नव्हती. काल अधिकच अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबियांनी त्यांना पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. प्रतिभाताई पाटील यांचे वय 89 वर्ष इतके आहे. प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. 2007 ते 2012 त्यांनी राष्ट्रपतीपद भूषवले आहे.

डॉक्टरांनी प्रतिभाताई पाटील यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. त्यांची तब्यत लवकर सुधारेल अशी आशा व्यक्त केली ( Pune) जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.