Pune : लग्नाला नकार दिल्याने तरुणीची गळफास घेत आत्महत्या, प्रियकरा विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – प्रेमसंबध ठेवून पुढे लग्नाला नकार दिल्याने 19 वर्षीय ( Pune)  तरुणीने नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना उरुळी देवाचीमध्ये सोमवारी (दि.27) सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रेयसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी प्रियकर आदित्य अशोक जाधव (रा. राजुरी, ता. पुरंदर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडीतेच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Mumbai Pune Express Highway : आज मुंबई पुणे दृतगती मार्गावर तीन तासांचा ब्लॉक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य आणि आत्महत्या केलेली तरुणी दोघे एकाच गावातील रहिवासी आहेत. दोघांचे प्रेमसंबंध होते. विवाहाचे आमिष दाखवून पीडीतेला घेऊन आदित्य गावातून पसार झाला. त्यानंतर तिने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने विवाहास नकार दिला.

मी विवाह करणार नाही, तुला जे करायचे ते कर, अशी धमकी दिली. आदित्यने त्रास दिल्याने ती हडपसर-सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात राहणाऱ्या मामाकडे आली होती. ऊरळी देवाची परिसरात तिने मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे तपास करत ( Pune) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.