Pune : मयत रुग्णाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली; प्रसिद्ध रुग्णालयाच्या वॉर्डबॉय विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज : चक्कर येऊन खाली कोसळलेल्या (Pune) एका व्यक्तीला पुण्याच्या वानवडी परिसरातील एका प्रसिद्ध रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. या मयत रुग्णालयाच्या गळ्यातील सोनसाखळी याच रुग्णालयातील एका वॉर्डबॉयने चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आता वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारुती किसन भालेराव (वय 36, रा. आझानगर, वानवडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाॅर्डबाॅयचे नाव आहे. याबाबत दीपक चंदू परदेशी (वय 60, रा. वैदुवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दीपक यांचे भाऊ 25 मार्च रोजी वानवडीतून पायी जात होते. यावेळी त्यांना चक्कर आल्याने ते अचानक खाली कोसळले.

तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी त्यांना तातडीने जवळच्याच एका प्रसिद्ध रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानतंर फिर्यादी दीपक रुग्णालयात पोहोचले. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून मृतदेह ताब्यात घेतला.

मात्र मृतदेह ताब्यात घेत असताना त्याच्या गळ्यातली सोनसाखळी त्यांना दिसली नाही. अंत्यविधी आटोपल्यानंतर दीपक यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन वाॅर्डबाॅय भालेराव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड (Pune) तपास करत आहेत.

Manobodh by Priya Shende Part 91 : मनोबोध भाग 91 – नको वीट मानू रघूनायेकाचा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.