Pune Crime : कर्मचाऱ्यांच्या PF ची अफरातफरी; कंपनीच्या डायरेक्टरवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : भविष्य निर्वाह निधीचा (Pune Crime) अपहार केल्याप्रकरणी एस.एन. सिस्टम प्रा.लि. कंपनीच्या डायरेक्टरवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या 11 महिन्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा अपहार केला असल्याचे म्हटले आहे.

याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात कंपनीचा डायरेक्टर ओमकार सूनिल नाथी (रा. ग्रीन पार्क, फ्लॅट क्र. बी 403, सहकारनगर क्रमांक 2) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधिकारी भानूप्रकाश कोटीकलपूडी (वय 49) यांनी तक्रार दिली आहे.

ओमकार नाथी हा एस.एन. सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड कंपनी युनिट क्रमांक 30 चा डायरेक्टर आहे. त्याने कंपनीतील कर्मचाऱ्यांचा जानेवारी 2020 ते नोव्हेंबर 2020 या 11 महिन्यांच्या मासिक पगारातून भविष्य निर्वाह निधीची एकुण रक्कम २ लाख 83 हजार 409 रुपये कपात केली.

मात्र, ती रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या खात्यावर जमा न करता कंपनीच्या कर्मचार्यांाचा विश्वासघात करून ही रक्कम स्वतःच्या फायद्याकरिता वापरून अपहार केला. हा प्रकार समोर आल्यानंतर (Pune Crime) तक्रार देण्यात आली होती. त्यानूसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक डोंगरे करीत आहेत.

Pune : मयत रुग्णाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली; प्रसिद्ध रुग्णालयाच्या वॉर्डबॉय विरोधात गुन्हा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.