Ravet News: निवडणूक विभागाच्या गोदामासाठी 155 औषधी झाडे तोडणार

एमपीसी न्यूज – केंद्रीय निवडणूक (Ravet News) आयोगाची मतदान यंत्रे (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन – ईव्हीएम) आणि व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) ठेवण्यासाठी रावेत येथे गोदाम उभारले जाणार आहे. पण, त्यासाठी या सुमारे सात एकर जागेवरील 155 विविध दुर्मिळ देशी व औषधी पर्यावरणपूरक झाडे तोडली जाणार असल्याने विविध पर्यावरण प्रेमी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

निवडणूक आयोगाची मतदान यंत्रे ठेवण्यासाठी सध्या भोसरी येथील वखार महामंडळाच्या गोदामाचा वापर केला जातो. ईव्हीएम यंत्रे ठेवण्यासाठी हक्काची जागा आवश्यक असल्याने रावेत येथील जागा देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्याकरिता गेल्या दोन महिन्यांपासून या ठिकाणी निवडणूक विभागाने मेट्रो पार्कच्या जागेत इमारतीसाठी खोदकाम सुरू केले आहे. त्यास शहरातील पर्यावरणप्रेमी संघटनांनी कडाडून विरोध केला आहे.

Pune : मयत रुग्णाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली; प्रसिद्ध रुग्णालयाच्या वॉर्डबॉय विरोधात गुन्हा

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मेट्रो पार्कच्या विकासाला मान्यता दिली. पुणे मेट्रोच्या मार्गातील झाडे तोडून न टाकता या झाडांचे या ठिकाणी पुर्नरोपण करण्यात आले आहे. या भागात असणाऱ्या झाडांना एक प्रकारे जीवदान मिळाले आहे.

गोदामासाठी दिलेल्या जागेतील इको पार्क मधील दीड ते दोन एकर (Ravet News) जागेतील ही झाडे आहेत. सध्या या ठिकाणी पक्ष्यांचा किलबिलाट व विविध प्रजातींचा आधिवास वाढला आहे. त्यामुळे रावेतमधील वैभव समजल्या जाणाऱ्या ‘मेट्रो इको पार्क’ वाचविण्यासाठी पर्यावरण प्रेमी संघटना सरसावल्या आहेत. दरम्यान, जागा आम्ही दिली. पण, बांधकाम परवानगी महापालिकेने दिल्याचे सांगत पीएमआरडीएने हात झटकले. तर, झाडे तोडण्याचा विषय आमच्यापर्यंत आला नसल्याचे महापालिकेच्या उद्यान विभागाकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.