Kondhwa : गुड टच, बॅड टच उपक्रम ठरतोय प्रभावी; बाल अत्याचाराचे दोन गुन्हे उघडकीस

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांचा सामाजिक संस्थांच्या मदतीने (Kondhwa) सुरू असलेला गुड टच, बॅड टचचा उपक्रम प्रभावी ठरत आहे. दोन गुन्ह्यांना वाचा फुटली आहे. पोलिसांकडून शाळा व महाविद्यालयात हा उपक्रम राबविला जात आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

पहिल्या गुन्ह्यानुसार, पिडीत मुलगी ही 2011 साली एल. के.जी ला असल्यापासून ते इयत्ता आठवी पर्यंत तिला दोघांनी वासनेची शिकार बनवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार या निमित्ताने उघड झाला आहे. याप्रकरणी तिने दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय आहिरे (28, रा. कोंढवा) आणि सोनु बबन व्हावळे (26) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तिच्या व आरोपींच्या घरी कोणी नसताना घडला.

Ravet News: निवडणूक विभागाच्या गोदामासाठी 155 औषधी झाडे तोडणार

तर दुसऱ्या गुन्ह्यात पिडीतेच्या ओळखीच्या महिलेचा भावाने देखील तिचा विनयभंग (Kondhwa) केल्याच्या प्रकाराची माहिती दिल्याने राहुल गायकवाड (28, रा. वारजे माळवाडी) नावाच्या एकावर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.