Pune : पदवीधर मतदार संघ ऑनलाईन नोंदणी लिंकच्या त्रुटी त्वरित दूर करा : डॉ. राजेंद्र खेडेकर

Gradually remove the error of the graduate constituency online registration link: Dr. Rajendra Khedekar

एमपीसी न्यूज – पुणे पदवीधर मतदार संघ ऑनलाईन नोंदणी लिंकच्या त्रुटी त्वरित दूर करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्याचे निवडणूक आयोगाकडून निर्देश आलेले आहेत. ही नोंदणी ऑनलाईन होण्यासाठी मी स्वतः वैयक्तिक रित्या वारंवार पाठपुरावा केलेला आहे.

सध्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे पदवीधर घरी असल्यामुळे जास्तीत जास्त नोंदणी होणे अपेक्षित आहे. मात्र, दुर्दैवाने लिंक ओपन न होणे, पुढे न सरकणे किंवा फोटो अपलोड न होणे, सब्मिट न होणे, या अनेक अडचणींमुळे सर्वसामान्य पदवीधर थेट निवडणूक आयोगाच्या साइटवर अर्ज भरून शकत नाहीत.

त्यामुळे या अडचणी त्वरित सोडवून थेट आपल्या वेबसाईटवर जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही डॉ. खेडेकर यांनी म्हटले आहे.

इतर ठिकाणाहून होणाऱ्या नोंदणीमुळे मतदारांचा महत्त्वपूर्ण माहितीचा दुरुपयोग होणार नाही. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी पुणे, सातारा सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि मुख्य निवडणूक आयोग मुंबई यांना पाठविण्यात आली आहे.

दरम्यान, मागील दोन्ही पदवीधर निवडणुकीत युतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचाराची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे आणि सक्षमपणे पार पाडली आहे. यावेळी आपण स्वतः भाजपतर्फे ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.