Coronavirus In Bollywood: करण जोहरच्या घरात कोरोनाची एन्ट्री, दोघांना लागण

bollywood director Karan Johar's two staff infected with coronavirus

एमपीसी न्यूज- निर्माता बोनी कपूर यांच्या पाठोपाठ दिग्दर्शक करण जोहरच्या घरातही कोरोना विषाणूने प्रवेश केला आहे. घरातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे करण जोहरने स्वतः  सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले आहे.

करण जोहरने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माझ्या घरातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून, संबंधित कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे लक्षात येताच त्यांना घरातच क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच मुंबई महापालिकेला सुद्धा याविषयी माहिती कळवण्यात आली आहे. नियमानुसार संपूर्ण इमारत सॅनिटाइज करण्यात आली आहे. कुटुंबातील इतर लोक आणि सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. इतरांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.


करण पुढे म्हणाला, आम्ही सगळ्यांनी कोरोनाची चाचणी केली. मात्र सगळ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. परंतु, सुरक्षेच्यादृष्टीने आम्हा सगळ्यांना 14 दिवस विलगीकरणात ठेवले आहे. घरातील ज्या दोन सदस्यांना लागण झाली आहे, त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाईल. हा कठीण क्षण असून घरात राहून आणि योग्य ती काळजी घेऊन आपण संकटावर मात करु. सगळ्यांनी घरात रहा आणि काळजी घ्या. असे आवाहन त्याने केले आहे.

बॉलिवूडमध्ये सुद्धा बऱ्याच कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सुरवातीला प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला याची लागण झाली होती तर दोन दिवसांपूर्वी किरण कुमार यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.