Pimpri Chinchwad Traffic Diversion : जरांगे पाटील यांची पदयात्रा बुधवारी पिंपरी चिंचवड शहरात; आठ वाहतूक विभागातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Pimpri Chinchwad Traffic Diversion)यांच्या नेतृत्वाखालील पदयात्रा बुधवारी (दि. 24) पिंपरी चिंचवड शहरात येत आहे.

या पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने नागरिक आणि वाहनांचा सहभाग असणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरातील आठ वाहतूक विभागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे.

पदयात्रा राजीव गांधी ब्रिज – जगताप डेअरी – डांगे चौक – बिर्ला हॉस्पीटल – चापेकर चौक – अहिंसा चौक – महाविर चौक – खंडोबामाळ चौक – टिळक चौक – भक्ती शक्ती – पुना गेट – देहूरोड – तळेगाव मार्गे मुंबई बाजूकडे जाणार आहे. बुधवारी सकाळी सहा पासून वाहतूक वळविण्यात येणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

सांगवी वाहतूक विभाग

आँध डी मार्ट कडून सर्व प्रकारच्या वहनांना सांगवी(Pimpri Chinchwad Traffic Diversion) फाट्याकडे येण्यास प्रवेश बंदी करण्यात येत असून या मार्गावरील वाहने पोल चौक येथून डावीकडे नागराज रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.

पिंपळे निलख कडून येणारी सर्व प्रकारची वाहने रक्षक चौकाकडे न येता ती विशालनगर डीपी रोडने जगताप चौक – कस्पटे चौक मार्गे जातील.

जगताप डेअरी ब्रीज खालील चौकामध्ये कस्पटे चौकाकडून येणारी सर्व प्रकारची वाहने डाव्या व उजव्या बाजूने औंध – रावेत रोडला न येता ती सरळ ग्रेड सेपरेटरमधून शिवार चौक कोकणे चौकाकडून इच्छित स्थळी जातील.

शिवार चौकाकडून येणारी वाहतूक उजव्या डाव्या बाजूने औंध रावेत रोडला न येता ती सरळ ग्रेड सेपरेटरमधून कस्पटे चौकातून जातील.

तापकीर चौक, एमएम चौकाकडून काळेवाडी फाटा ब्रीजकडे येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत असून सदर मार्गावरील वाहने रहाटणी फाटा चौकातून रहाटणी गाव गोडांबे चौकाकडून जातील.

सांगवी गावातून सांगवी फाट्याकडे येणारी सर्व प्रकारची वाहने शितोळे पंप जुनी सांगवी व वसंतदादा पुतळा वाकड वाहतूक विभाग चौक जुनी सांगवी दापोडी मार्गे जातील.

वाकड वाहतूक विभाग

ताथवडे गाव चौकाकडून डांगे चौकाकडे येणारी वाहने ताथवडे चौकामधून उजवीकडे वळून ताथवडे अंडरपास किंवा परत हँगिंग ब्रिज मार्गे जातील.

काळाखडक येथून डांगे चौकाकडे जाणारी वाहने काळाखडक येथून यु टर्न घेवून भुमकर चौक मार्गे जातील

वाकड दत्तमंदिर रोडने डांगे चौकाकडे येणारी वाहने अण्णाभाऊ साठे चौकातून उजवीकडे किंवा डावीकडे वळून जातील.

छत्रपती चौक कस्पटे वस्ती येथून काळेवाडी फाट्याकडे येणारी वाहने छत्रपती चौक येथून डावीकडे वळून जातील.

बारणे कॉर्नर थेरगाच येथून थेरगाव फाट्याकडे येणारी वाहने उजवीकडे वळून जातील किंवा यु टर्न घेवून तापकिर चौकाकडे जातील.

थेरगाव कडून बिर्ला हॉस्पीटल चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून ही वाहने राघवेंद्र महाराज मठ येथून जातील किंवा बारणे कॉर्नर थेरगाव मार्गे जातील.

कावेरीनगर पोलीस वसाहतीकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कावेरीनगर अंडरपासकडे जाण्यास प्रवेश बंदी करण्यात येत असून ही वाहने वाकड भाजीमंडई समोरील कॉर्नर येथून डावीकडे याकड पोलीस स्टेशनकडील रस्त्याने दत्त मंदिर रोडने जातील.

चिंचवड वाहतूक विभाग

दळवीनगर चौकाकडून खंडोबामाळ व चिंचवड स्टेशनकडे जाणारा रोड सर्व वाहनासाठी बंद करण्यात येत असून या मार्गावरील वाहने बिजलीनगर चौक मार्गाने जातील.

रिव्हर व्ह्यू चौकातून डांगे चौक तसेच डांगे चौकाकडून महावीर चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांस प्रवेश बंद करण्यात येत असून या मार्गावरील वाहने चिंचवडे फार्म मार्गाने वाल्हेकरवाडी रावेत मार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच भोसरीकडे जाणारी वाहने बिजलीनगर वाल्हेकरवाडी मार्गे जातील.

चिंचवडे नगर टी जंक्शनकडे रिव्हर व्ह्यू कडून जाणारी वाहने सरळ रावेत मार्गे जातील.

लोकमान्य हॉस्पीटल चौक, चिंचवड समोरील रोडवरून महाविर चौक चिंचवडकडे जाणारा रोड सर्व वाहनांसाठी बंद करण्यात येत असून या मार्गावरील वाहने लोकमान्य हॉस्पीटल चौकापासून डावीकडे वळून दळवीनगर मार्गे जातील.

एस. के.एफ. चौक चिंचवड मार्गाने खंडोबा माळ चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून या मार्गावरील वाहने बिजलीनगर चौक मार्गाने जातील.

लिंकरोड पिंपरी कडून येणारी वाहने चापेकर चौकात न येता ती मोरया हॉस्पीटल चौक केशवनगर मार्गे जातील.

महाविर चौक व शिवाजी चौकात येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून या मार्गावरील वाहने मोहननगर चौकमार्गे जातील.

बिजलीनगर चौकाकडून त्रिवेणी हॉस्पीटल चौकाकडून रिव्हर व्ह्यू चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून या मार्गावरील वाहतूक रावेत मार्गे जाईल

मुकाई चौकाकडून चिंचवडकडे येणारी वाहतूक त्रिवेणी हॉस्पीटल वाल्हेकरवाडी येथे डावीकडे वळून पुढे पार्श्वनाथ चौक, भेळ चौक मार्गे पुढे काचघर चौकातून डावीकडे वळून पुढे यु टर्न घेवून भक्ती शक्ती चौकातील भुयारी मार्गातून अंकुश चौक, त्रिवेणीनगर मार्गे जातील.

पिंपरी वाहतूक विभाग

निरामय हॉस्पीटलकडून महावीर चौकाकडे येणारी वाहतूक सरळ व उजवीकडे न जात ती डाव्या बाजूकडे वळून मोरवाडी चौक मार्गे जाईल.

परशुराम चौकाकडून खंडोबामाळ चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून सदरची वाहतूक आर डी आगा – थरमॅक्स चौक मार्गे जाईल.

के.एस.बी चौकाकडून महावीर चौक तसेच छत्रपती शिवाजी चौकात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून या मार्गावरील वाहने बसवेश्वर चौक येथून डावीकडे वळून अॅटो क्लस्टर मार्गे जातील.

Pimpri : अहंकाराचा त्याग करा – हभप नील महाराज करंजकर

निगडी वाहतूक विभाग

थरमॅक्स चौकाकडून येणारी वाहतूक आर. डी. आगा मार्गाकडून गरवारे कपंनी कंपाऊड पर्यंत येवुन तेथील टी जॅक्शन वरुन खंडोबामाळ चौकाकडे न जाता ती डावीकडून परशुराम चौकाकडून मोहननगर मार्गे जाईल.

दळवीनगर पुलाकडुन व आकुर्डी गावठाणातुन येणारी वाहतुक खंडोबामाळ चौकाकडे न येता गणेश मार्गे व आकुर्डी गावठाण मार्गे जाईल.

दुर्गा चौकाकडून येणारी वाहतूक टिळक चौकाकडे न येता ती थरमॅक्स चौकाकडे किंवा यमुनानगर मार्गे जाईल.

भेळ चौकाकडून येणारी वाहतूक टिळक चौकाकडे न येता ती सावली हॉटेल मार्गे जाईल

अप्पूघर/रावेतकडून येणारी वाहतूक व ट्रान्सपोर्टनगर मधुन येणारी वाहतूक भक्ती शक्ती ब्रिजवर न चढता ती भक्ती शक्ती सर्कलखालच्या भुयारी मार्गाने (अंडरपासमधून) अंकुश चौक, त्रिवेणीनगर मार्गे जाईल.

त्रिवेणीनगर अंकुश चौकाकडून भक्ती शक्तीकडून देहुरोडकडे जाणारी वाहतुक भक्ती शक्ती सर्कलखालच्या भुयारी मार्गाने (अंडरपासमधून) सरळ अप्पुघर रावेत मार्गे देहुरोड मुंबईकडे जाईल.

देहूरोड कडून येणारी वाहतूक भक्ती शक्ती सर्कल वरुन त्रिवेणीनगर चौकाकडे वळवतील. किंवा पुनागेट हॉटेल समोरुन भक्ती शक्ती उड्डाणपुलावरून सरळ ग्रेडसेपरेटरमधुन जाईल.

भक्ती शक्त्तीकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक वळवून हँगीग ब्रिज मार्गे जाईल

भोसरी वाहतूक विभाग

पुणे, खडकी, दापोडी, फुगेवाडी बाजूकडून भक्ती शक्ती चौकाकडे जाणारी वाहने भक्ती शक्ती चौकाकडे न जाता ती वाहने नाशिक फाट्यावरुन मोशी चौक किंवा कस्पटे चौक मार्गे जातील.

चाकण, मोशी, आळंदी बाजूकडून नाशिक फाटा मार्गे मुंबई बाजूकडे जाणारी वाहने हि पांजरपोळ जंक्शनवरुन स्पाईन रोडने त्रिवेणीनगर, भक्ती शक्ती अंडरपासमधून रावेत मार्गे जातील किंवा नाशिक फाटा कस्पटे चौक वाकड नाका मार्गे जातील.

देहुरोड वाहतूक विभाग

तळवडेकडून देहुकमान जुना मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्ण बंद करुन देहुगाव मार्गे जाईल.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरुन येणारी वाहतूक सोमाटणे एक्झिट, देहुरोड एक्झिट पुर्ण पणे बंद करुन बेंगलोर हायवेने जाईल.

Pimpri : श्रीरामांची प्रतिष्ठापना व्हावी ही कोट्यावधी भारतीयांची मनोकामना – अश्विनी जगताप 

बेंगलोर हायवेने मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक किवळे ब्रिज कडून जुन्या हायवेने येण्यास पुर्णपणे बंदी करण्यात येत असून जड अवजड व छोटी वाहने एक्स्प्रेस वेने इच्छित स्थळी जातील. तसेच दुचाकी वाहने किवळे पंचर मधुन कृष्णा चौक लोढा स्किम-गहुंजे गाव मार्गे इच्छित स्थळी जातील.

मुंबई कडून पुण्याकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक सेंट्रल चौकातून बेंगलोर हायवेने जाईल

मोर्चा जुन्या हायवेने जाणार असल्याने भक्ती शक्तीचौक येथे आल्यानंतर वडगाव चौकातून पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्यात येत आहे.

तळेगाव वाहतूक विभाग

तळेगाव चाकण रोड 548 डी वरील मुंबईच्या दिशेने जाणारी जड व अवजड वाहतुकीला प्रवेश बंद करुन सदर मार्गावरील वाहने महाळुंगे वाहतुक विभागातील एच.पी चौक मार्गे जातील.

तळेगाव गावठाणकडून लिंब फाट्याकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक सरळ व उजवीकडे न जाता ती डाव्या बाजूने जाईल.

बेलाडोर मार्गे ए.बी.सी पेट्रोलपंप चौकात येणारी सर्व प्रकारची वाहतूक सरळ व उजवीकडे न जाता ती डाव्या बाजूने जाईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.