Pune : महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य घराघरात पोहोचवण्यासाठी सत्यशोधक रथाचे पूजन

एमपीसी न्यूज – महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य घराघरात पोहोचवण्यासाठी (Pune)सत्यशोधक रथाचे पूजन डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित समता फिल्म्स यांचा सत्यशोधक चित्रपट 5 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात संदीप कुलकर्णी, राजश्री देशपांडे, रवींद्र मंकणी, रवींद्र पटवर्धन, डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांच्या प्रमुख आहेत. शिक्षण क्षेत्रात फुले दांपत्याने केलेलं कार्य हे पिढ्यानपिढ्या साठी प्रेरणादायी आहेत.

Pune : संस्कृत प्रेमी नागरिकांसाठी कात्रज येथे एक दिवसाच्या संमेलनाचे आयोजन

मात्र, या व्यतिरिक्त खडकवासला धरण असेल विधवा स्त्रियांचे केसवपन, (Pune)भ्रष्टाचार थोडक्यात संघर्षातून चांगल्या गोष्टीसाठी लढा देणार यासाठी राष्ट्रपुरुषांमधील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. यामुळेच की काय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना गुरुस्थानी मानले होते. महात्मा फुले यांना भारतीय सामाजिक कार्याचे जनक असे म्हटले जाते.

त्यांच्यासोबत आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद यांनी केलेलं कार्यही या चित्रपटात काही प्रमाणात दाखवलेले आहे. नको त्या चित्रपटांची अनेक राजकीय पक्षांकडून सक्ती केली जाते, खऱ्या अर्थाने सत्यशोधक सारखे चित्रपट नागरिकांनी राजकीय पक्षांनी उचलून धरले पाहिजे, असे मत डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी रथाचे उद्घाटनाच्या वेळी केले. यावेळी चित्रपटाचे निर्माते आप्पा बोराटे, बाळासाहेब बांगर, माजी नगरसेवक जितेंद्र आल्हाट, वंदना आल्हाट, अलका वाघोल, मोशी गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.

यावेळी सावित्रीबाई फुले मागासवर्गीय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने तसेच समता फिल्म्स व समस्त मोशीकरांच्या वतीने डॉ. राजेंद्र खेडेकर यांना सन्मानित करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.