Pune :  पुणे पोलीसांनी “मराठा मोर्चा” मार्ग बदलण्यासाठी दबाब टाकू नये; पुर्वीचा मार्ग कायम ठेवावा -डॉ. धनंजय जाधव

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Pune)यांनी अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढली आहे. त्यानिमित्ताने बुधवारी पहाटे 4 वाजता मराठा मोर्चा खराडीत पोहोचले.खराडीतून जरांगे पाटील सकाळी लोणावळ्याकडे मार्गस्थ झाले.
या पदयात्रेत मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले होते. दरम्यान मराठा आरक्षण पदयात्रेच्या मार्गात बदल करण्यात आल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र मनोज जरांगे पाटील तसेच मराठा आरक्षण पदयात्रेकडून अद्याप असा कोणताही बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले नाही.

मराठा आरक्षण रॅली ही नगर रोडने गुंजन चौक, पर्णकुटी चौक, (Pune)तारकेश्वर चौक, सादलबाबा चौक, संगमवाडी मार्गे पुढे संचेती चौक, सिमला ऑफिस चौक, सुर्यमुखी दत्तमंदिर चौक, विद्यापीठ चौक, औंध रोडने सरळ राजीव गांधी पुल मार्गे मार्गक्रमण करणार आहे.तरी वाहनचालकांनी वर नमुद मार्गाचा वापर न करता इतर पर्यायी मार्गाचा वापर करुन वाहतूक पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले.
पुणे पोलीसांनी दबाब टाकू नये पुर्वीचा मार्ग कायम ठेवावा
पुणे पोलीसांनी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करु नये, मनोज जरांगे पाटील यांच्या पायी यात्रेचा पुणे शहरातील संचेती हॉस्पिटल चौक , शिवाजीनगर, पुणे विद्यापीठ मार्ग बदलू नये.सध्या प्रसार माध्यमांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या यात्रेचा मार्ग बदल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. पुणे पोलीसांनी दबाब टाकू नये व पुर्वीचा मार्ग कायम ठेवावा अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ता सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव यांनी केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.