Pune : पुढच्या पिढ्यांवर परिणाम करणाऱ्या विषयांना महत्त्व द्यावे; माजी नगरसेवकांची मागणी

एमपीसी न्यूज – प्रारूप आराखडे होतील राजकारण चालू राहील, (Pune) परंतु पर्यावरण दृष्ट्या महत्त्वाचा विषय जो पुढच्या पिढ्यांवर परिणाम करणारा असेल, त्याला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे. 

आजची पीएमआरडीएच्या प्रारूप आराखड्याला मान्यता देणारी बैठक पुढे ढकलल्यामुळे संचालक नगर रचना यांनी दिलेली मुदत 27 जानेवारी रोजी संपत आहे.

उद्या बैठक घेता येणार नाही. कारण, तीन दिवस आधी सूचना द्यावी लागेल, 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आहे आणि 27 तारखेला शनिवार असल्याने शासकीय कार्यालयांना सुट्टी आहे, अशा परिस्थितीत महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायदा कलम 162 अन्वये या प्रारूप विकास आराखड्याचे भवितव्य हे सहसंचालक नगर रचना यांच्याकडे  जाणार आहे.

पीएमआरडीएच्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये 23 गावे निवडणुकीसाठी पुणे महानगरपालिकेत घेण्याच्या तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारच्या निर्णयामुळे एक असाधारण परिस्थिती निर्माण झाली होती.

ही गाव पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट केल्यामुळे पीएमआरडीएच्या प्रारूप विकास आराखड्यातून ही गावे वगळावी लागणार होती.

दरम्यानच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेने (Pune) MR&TP Act कलम 23 व 24 अन्वये या 23 गावांचा आराखडा तयार करण्याचा इरादा जाहीर केला आणि नगर नियोजन अधिकारी यांची नेमणूक केली.

या हालचाली नंतर राज्य सरकारच्या समोर मोठा पेच प्रसंग निर्माण झाला. पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीची आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आणि जास्तीत जास्त विकास प्रस्ताव असणारा 23 गावांचा आराखडा हातातून जाऊ देता येत नसल्याने पीएमआरडीए यांना विशेष प्राधिकरण म्हणून प्राधिकृत केले, इथपर्यंत हे ठीक होते.

विशेष नियोजन प्राधिकरणाला प्रारूप विकास आराखडा तयार करता येतो का नाही. याचा निर्णय हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे त्यावर चर्चा इथे नाही.

परंतु, घाई घाई मध्ये महानगरपालिकेच्या इराद्या वर्तमानपत्रात जाहीर होण्याच्या आधी पीएमआरडीएने प्रारूप विकास आराखडा जाहीर केला आणि यामध्ये गंभीर चुका झाल्या.

त्या हरकती सूचनांच्याद्वारे नियोजन समिती समोर मांडल्या आहेत, World Heritage site Western Ghat हा या विकास आराखड्यामध्ये दाखवण्याचे विसरून गेले.

Charholi : दारू प्यायला पैसे न दिल्याने तरुणास मारहाण

आज बैठकीमध्ये प्रारूप विकास आराखडा मंजूर करण्यापूर्वी World Heritage site Western Ghat हा दर्शवून त्याचे नकाशे प्रसिद्ध करून मग मान्यता घ्यावी तसेच MR&TP Act कलम २८(४) अन्वये अहवाल संकेतस्थळावर टाकावा.

या पश्चिम घाटावर भारताचा मान्सून अवलंबून आहे.  इतका महत्त्वाचा हा विषय असून केवळ पुणे महानगरपालिकेला प्रारूप विकास आराखडा तयार करायला मिळू नये यासाठी घाईघाईत विसरलेला विषय आहे. आपण आमच्या पत्राची योग्य ती दखल घेऊन योग्य निर्णय कराल ही अपेक्षा आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रधान सचिव नगर विकास विभाग 1, संचालक नगर रचना महाराष्ट्र, विभागीय आयुक्त पुणे, आयुक्त पुणे मनपा, महानगर आयुक्त पीएमआरडीए, जिल्हाधिकारी पुणे यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.