BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पार्क केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून तो अलगद चोरायचा पर्स अन रोख रक्कम

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – मॉल, गार्डन, सोसायटी पार्किंग याठिकाणी पार्क केलेल्या ऍक्टिवा, एक्ससिस आणि मोपेड दुचाकींच्या डिक्कीतून मौल्यवान ऐवज चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सुभाष उर्फ बाबा लक्ष्मण बनपट्टे असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बनपट्टे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तीन आठवड्यापूर्वी त्याने नाना पेठेत पार्किंगमधील अॅक्टीवा दुचाकीच्या डिकीतून पैसे चोरलर होते. त्याने आतापर्यंत 30 – 40 गुन्हा केले तर बारा गुन्हा उघडकीस आले आहेत. आतापर्यंत त्याने चोरी केलेले पैसे बँकेत पैसे जमा करत चार लाख 27 हजार रुपये जमा केले होते. तर काही पैशाची त्याने एफडी ही केल्याचे समोर आले आहे.

  • चोरीच्या गुन्ह्यात यापूर्वीही त्याला अटक करण्यात आली होती. तो चार महिने तुरुंगात राहून नुकताच बाहेर आला होता. बाहेर आल्यानंतर त्याने परत चोऱ्या करण्यास सुरुवात केली. अखेर पुन्हा एकदा पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
HB_POST_END_FTR-A4

.