Pune : महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासणे तर, सभागृहनेतेपदी धीरज घाटे

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या स्थयी समिती अध्यक्षपदी हेमंत रासणे तर, सभागृह नेतेपदी धीरज घाटे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.

सुनील कांबळे आणि सिध्दार्थ शिरोळे आमदार झाल्याने त्यांना पक्षाने राजीनामा देण्यास सांगितले होते. तर, सभागृह नेतेपदी श्रीनाथ भिमाले यांना पावणे तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला होता. रासणे हे तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तर, घाटे हे आक्रमक नगरसेवक म्हणून ओळखले जातात.

या दोन्ही पदावर राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांच्या गटाला डावलण्यात आले आहे. ‘पीएमपीएमएल’ संचालक पदावर कोणत्या नगरसेवकाला पाठवायचे, त्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. घाटे आणि रासणे हे दोन्ही नगरसेवक गणेश मंडळाचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.