Pune : ‘तो’ होर्डिंग अधिकृतच; स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट न दिल्यामुळे होर्डिंग हटविण्याचे काम; दोषींची चौकशी होणार 

एमपीसी न्यूज – स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट न दिल्यामुळे तात्काळ ‘ते’ होर्डिंग काढण्याचे काम सुरू होते. एकूण सहा होर्डिंग काढण्यात येणार होते. त्यापैकी चार होर्डिंग काढण्यात आले होते. पाचवे होर्डिंग काढताना दुर्घटना घडली. मात्र, हे होर्डिंग अधिकृत होते. या घटनेचा तपास चालू असून घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सेन्ट्रल रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी आणि विभागीय रेल्वे प्रबंधक मिलिंद देऊसकर यांनी दिली. 

रेल्वेचे होर्डिंग काढताना जुना बाजार येथे रिक्षावर होर्डिंग कोसळून चार जण ठार झाले होते. या बाबत आज रेल्वे विभागाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली.

यावेळी अधिक माहिती देताना उदासी म्हणाले, या घटनेचा तपास चालू असून घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. घटनेच्या तपासासाठी चार जणांची कमिटी तयार केली आहे. तसेच या घटनेची चौकशी सुरु आहे. दरम्यान, दुर्घटनाग्रस्तांना ताततडीने मदत जाहीर करण्यात आली असून पोलिसांना आमचे पूर्ण सहकार्य राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.