Sangvi : तरुणीचा विनयभंग करणारा गजाआड

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून तरुणीचा पाठलाग करून अश्लील हावभाव करणा-या तरुणाला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.

सोन्या ऊर्फ विक्रांत वसंत जगताप (वय 24, रा. राजाराम नगर, नवी सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी जगताप हा मे 2018 पासून फिर्यादीचा वारंवार दुचाकीवरून पाठलाग करत होता. कट मारत अश्लील कंमेट पास करत होता. वारंवार होणा-या त्रासाला कंटाळून तरुणीने पोलिसात धाव घेत तरुणाविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.