_MPC_DIR_MPU_III

Pune : ‘आयसीएआय’ पुणेतर्फे विद्यार्थी, सीए सदस्यांना मदतीचा हात

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन काळात अनेकांना राहण्याच्या, उदारनिर्वाहाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यात अनेक सीए परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा व ‘सीए’चाही समावेश आहे. अशा गरजूंना अन्न, औषधे व तात्पुरत्या स्वरूपातील निवारा उपलब्ध करून देण्यासाठी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेच्या वतीने सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला असून त्यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

कोरोना व्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे. लॉकडाऊनसह अन्य उपाययोजना केल्या जात आहेत. सीए आणि विद्यार्थ्यांनीही राष्ट्रासमोरील या संकटाचा सामना करण्यासाठी योगदान देण्याचे ठरवले आहे. गरजू सीए सभासद व विद्यार्थ्यांनी आपल्या भागासह नाव आणि कोणत्या स्वरुपात मदत हवी ते कळवायचे आहे.

त्यासाठी ‘आयसीएआय’ पुणेचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे (९८९०५४१५५१), उपाध्यक्ष सीए समीर लड्डा (९८५०८३८४६१), सीए काशिनाथ पठारे (९८९०६२५७५८), सीए ऋता चितळे (८३९०६१०१३६), सीए सर्वेश जोशी (९८२२०२२२९२), श्वेताली शेलार (८२३७१६६००५), स्वाती खुळे (८२३७१६६००३) व दीपक कोरगावकर (८२३७१६६००८) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन सीए समीर लड्डा यांनी केले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.