Pune : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ, मुळीक यांच्या पाठोपाठ देवधर यांचेही जोरदार शक्तिप्रदर्शन

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर (Pune )आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघात माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक यांनी विविध प्रकारचे मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले आहे.

आपलेही नाव माघे राहू नये म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर (Pune)यांनी बाईक रॅली आणि धनगर समाज मेळावा आयोजित केला आहे. मोहोळ, मुळीक पाठोपाठ देवधर यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू केल्याची कुजबुज आहे.

दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही लोकसभा निवडणूक होणार आहे. पोटनिवडणूक घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात आले होते. मात्र, निवडणूक आयोगाने ही निवडणूक घेण्यास टाळाटाळ केली. त्यावर उच्च न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले.

Sharad Pawar : आगामी निवडणुकीत शरद पवार यांना फायदा होण्याची शक्यता

आता सार्वत्रिक लोकसभा निवडणूक होणार आहे. भाजपमध्ये तीनच नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) यांनीही भाजपचा प्रचार करणार असल्याचे सूचित केले आहे. जागा वाटपात हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आहेत.

2014 पासून पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचा झेंडा आहे. मोदी लाटेत या मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. 2024 मधेही मोडींचाच वरचष्मा ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी मोहोळ, मुळीक आणि देवधर यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. तर, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, आमदार माधुरी मिसाळ आणि बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.