Sharad Pawar : आगामी निवडणुकीत शरद पवार यांना फायदा होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – पक्षाचे नाव आणि चिन्ह जरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले असले तरी याचा खरा लाभ शरद पवार (Sharad Pawar) यांनाच मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाहेर पडून माहायुती सरकारला पाठिंबा देत सत्तेत वाटा मिळविला. 50 आमदार त्यांच्या सोबत असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीत अजित पवार यांची खरी परीक्षा होणार आहे. त्यांच्या सोबत बाहेर पडलेल्या उमेदवारांना निवडणून आणणे ही अजित पवार यांच्या समोर मोठी कसोटी असणार आहे. शरद पवार यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचे ठरविले आहे. पक्ष तळागाळात पोहोचविण्यासाठी सज्ज असल्याचे जाहीर केले आहे.

Pimpri : निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ शरद पवार गटाचे मुंडन आंदोलन

मोठ्या जड अंतकरणाने (Sharad Pawar) कार्यालयावरील नाव आणि चिन्ह झाकण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये शरद पवार यांच्या संदर्भात भावनिक लाट निर्माण झाली आहे. याचा फायदा आगामी निवडणुकीत होण्याची चिन्हे आहेत.

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने निर्णय घेत अजित पवार यांना हा मोठा विजय मिळाला असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. राज्यभर या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. तर, शरद पवार गटाने दुःख व्यक्त करीत आंदोलन केले आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार आहे. शिवसेना आणि काँग्रेस सोबत असल्याने त्याचा फायदा पवार यांना होणार आहे. घटक पाक्षांनाही त्याचा लाभ होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.