PCMC : आयुक्तांचे शहरवासीयांना ‘गिफ्ट’; आगामी आर्थिक वर्षात कोणतीही करवाढ, दरवाढ नाही

एमपीसी न्यूज – आगामी 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता करांचे व (PCMC )करेत्तर बाबींचे दर निश्चित करणे तसेच मालमत्ता सर्वेक्षणात नवीन आकारणी होणाऱ्या मालमत्तांचे प्रथम बिल दिल्यानंतर संपूर्ण मालमत्ता कराची आगाऊ रक्कम भरणा करणा-या मालमत्ताधारकांना सामान्य करात सवलत देण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. तसेच करवाढीचे दर पूर्वीप्रमाणे ठेवण्यासही मान्यता दिली. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात कोणतीही करवाढ, दरवाढ नाही होणार .

कासारवाडी मैला शुद्धीकरण केंद्रांतर्गत वार्षिक ठेकेदारी पद्धतीने (PCMC )दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी परिसर व उर्वरित भागामध्ये ड्रेनेज लाईनची व चेंबर्सची देखभाल दुरुस्ती करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दत्तवाडी, विठ्ठलवाडी परिसरात तसेच कासारवाडी मैला शुद्धीकरण केंद्रांतर्गत प्रभाग 2 व 6 मध्ये आणि पिंपळे सौदागर,विश्वशांती काॅलनी,काटेवस्ती,गावठाण परिसरात,पिंपळे निलख,विशालनगर,कस्पटेवस्ती,वेणूनगर, दत्त मंदीर, रहाटणी, रामनगर,शिवराजनगर येथील जलःनिसारण नलिका व मॅनहोल चेंबर्सची दुरूस्ती व देखभाल करणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

Pune : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ, मुळीक यांच्या पाठोपाठ देवधर यांचेही जोरदार शक्तिप्रदर्शन

चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी बिजलीनगर व इतर परिसरांमध्ये, किवळे विकासनगर, दत्तनगर,बापदेवनगर, आदर्शनगर व मामुर्डी येथील साईनगर, आदर्शनगर आझाद नगर परिसरामध्ये जुन्या जलनि:सारण नलिका बदलणे व ड्रेनेज लाईन्स व चेंबर्सची दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
कासारवाडी गेटाखालील रस्त्याची दुरुस्तीची कामे करणे कामी तसेच जलशुद्धीकरण सेक्टर 23 निगडी येतील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस उच्च दाब वीजभार वाढवणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक 26 पिंपळे निलख येथील रक्षक चौक ते पिंपळे निलख संरक्षण विभागाच्या हद्दीतील जाणाऱ्या 18 मीटर डीपी रस्त्यास सबवे करणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली. रावेत येथील हलविण्यात येणाऱ्या मुख्य जलवाहिनीस अडथळा करणाऱ्या 22 के.व्ही. भूमिगत केबल बदलणेकामी, तसे मेट्रो प्रकल्पांतर्गत दापोडी ते पिंपरी मेट्रो पूलाखाली सुशोभित खांब व दिवे बसवणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.