Pune : स्वत:चे अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप करणे योग्य नाही : चेतन तुपे

एमपीसी न्यूज – भाजपाच्या खासदारांनी सरकार अथवा उपमुख्यमंत्र्यावर टिका करण्यापेक्षा   गलिच्छ व गटातटाचे राजकारण थांबवावे. आपल्या शहरातून व राज्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी होईल. जागतिक महामारीचे संकट कसे कमी होईल, यासाठी राज्य सरकार व महापालिका यांच्या कामाबाबत सहकार्याची भुमीका घ्यावी आणि स्वत:चे अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप करू नयेत, अशा शब्दांत आमदार चेतन तुपे आणि महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी बापट यांच्यावर टीकास्त्र सोडले.

मंगळवारी बापट यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला तुपे आणि धुमाळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता आहे.

पुणे शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असताना या महामारीला रोखण्यासाठी महापालिका प्रशासन काम करीत आहे. मात्र, त्यामधील अनेक त्रुटी विरोधी पक्ष म्हणून वेळोवेळी दाखवल्या व दुरुस्त देखील करून घेतल्या आहेत. परंतु, याबाबत जाहीरपणे त्याची वाच्यता केली नाही.

_MPC_DIR_MPU_II

सध्या महापौर व आयुक्तांमध्ये असे काय बिनसले आहे की, ज्यामुळे खासदार गिरीश बापट आता टीका करत आहेत. बापट यांना जसा लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न विचारण्याचा हक्क आहे, तसाच पुणेकरांना देखील कोरोनाच्या कालावधीत गायब असणाऱ्या खासदारांनी पुणेकरांसाठी काय केले हा प्रश्न पुणेकर विचारत आहेत ? तसेच याबरोबरच खासदारांना पाहिलत का ? असा पुणेकरांना प्रश्न पडला आहे.

पालकमंत्री आठवड्यातून किमान दोन वेळा विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व इतर उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत कोरोना संदर्भात बैठका घेऊन आढावा घेत आहेत. त्याचबरोबर सूचना , मार्गदर्शन व आवश्यक असलेली राज्य सरकारकडून मदत देत आहेत.

या सर्व बैठकींना पुण्याचे महापौर हे स्वतः उपस्थित असतात, तरीही जर भाजपचे नेते सरकारवर किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिका करीत असतील, तर ते कोरोना सारख्या महामारीमध्ये जाणीवपूर्वक राजकारण करीत असून, यामुळे भाजपचा खरा चेहरा पुणेकरांसमोर आला आहे.

पालकमत्र्यांनी या काळात पालखी सोहळा, खरीप हगांमा संदर्भात व अनेक विषयांवर बैठका घेतल्या. राज्य शासनाच्या माध्यमातून कोरोना विषयक असणारे अनेक अध्यादेश काढलेले असल्याचे तुपे आणि धुमाळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.