Mumbai : कर्तव्यदक्ष पोलिसांना ‘वंदे मातरम’ मधून कृतज्ञतेचा सलाम

Mumbai : Greetings of gratitude from 'Vande Mataram' to the dutiful police

एमपीसी न्यूज – देशातील पोलीस करोनाच्या या महामारीमध्ये जनतेच्या सुरक्षेसाठी जीवाची बाजी लावून अहोरात्र काम करत आहेत. नागरिक घरात सुरक्षित असले तरी पोलिसांना कामावर जावेच लागत आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय कायम भीतीच्या दडपणाखाली आहेत. म्हणूनच ‘वंदे मातरम’ या लघुपटातून कर्तव्यदक्ष पोलिसांना कृतज्ञतेचा सलाम करण्यात आला आहे.

पोलिसांच्या कार्याला सलाम करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या शैलेंद्र सिंग निर्मित ‘वंदे मातरम’ या लघुपटाला प्रख्यात संगीतकार सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलं असून आर्या आंबेकर हिने या लघुपटातील ‘वंदे मातरम’ हे गीत गायलं आहे. दोन मिनीटांच्या या व्हिडीओमध्ये महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांच्या शौर्याला मानवंदना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये कर्तव्य बजावत असतानाचे पोलिसांचे काही मोलाचे क्षण टिपण्यात आले आहेत. या लघुपटाचं लेखन आणि दिग्दर्शन शैलेंद्र सिंग यांनी केले आहे.

अनेक कलाकारांनी, खेळाडूंनी, गायकांनी आपापल्या परीने ‘करोना वॉरियर्स’ना मानवंदना देण्यासाठी वेगवेगळ्या गीतांच्या माध्यमातून आपल्या भावना प्रकट केल्या आहेत. असाच प्रयत्न या व्हिडिओमधून करण्यात आला आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.