Trailer launch : “चौक” चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात संपन्न

एमपीसी न्यूज़- “एकच गेम वाजवणार, आख्खा जिल्हा गाजवणार…”या संवादाची चर्चा चौकाचौकात आहे, आणि आता ‘चौक’ चित्रपटाचा खिळवून ठेवणारा ट्रेलर आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होता क्षणीच सोशल मीडियावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. (Trailer Launch) वेगवान कथानक, चटपटीत संवाद, दर्जेदार अभिनय आणि उत्तम पार्श्वसंगीत या सगळ्या समीकरणामुळे ‘चौक’च्या ट्रेलरची चर्चा सगळीकडे आहे, आणि यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘चौक’च्या ट्रेलरमध्ये प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी यांचे हटके लूक आणि भूमिका, किरण गायकवाड, शुभंकर एकबोटे, अक्षय टंकसाळे, संस्कृतीबालगुडे या नव्या पिढीतील कलाकारांचा दर्जेदार अभिनय, स्नेहल तरडेंमधील संवेदनशील स्त्री, सुनिल अभ्यंकर, अंजली जोगळेकर, सुरेश विश्वकर्मा यांच्या अभिनयाची पकड, बालकलाकार अरित्रा देवेंद्र गायकवाड हिचा कौतुकास्पद अभिनय, याशिवाय दिग्दर्शक देवेंद्र अरूण गायकवाड यांची चित्रपटातील विशेष भूमिका या सगळ्याचाच चित्रपटावर खोलवर परिणाम झालेला दिसतो.

 

चौकचा ट्रेलर लॉन्च सोहळा चित्रपटातील कलाकार आणि मान्यवरांच्या उपस्थित दणक्यात पार पडला. यावेळी चौक चित्रपटातील कलाकारांसोबतच सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे, अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक, दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेत्री स्मिता गोंदकर व आदी मान्यवरही उपस्थित होते. हिंदुस्थानीभाऊ, प्रविण तरडे, संजय जाधव, चित्रपटाचे निर्माते दिलीप पाटील यांच्या हस्ते ट्रेलर लॉन्च करण्यात आले.(Trailer Launch) ‘मराठी चित्रपट हरवला होता, पण पुन्हा एकदा मराठी चित्रपटाला उंचीवर आणण्याचं काम या लोकांनी केलं आहे.’ असं मत हिंदुस्थानी भाऊने व्यक्त केलं. कार्यक्रमाच्या शेवटी किरण गायकवाडने डिजे होत सर्वपत्रकारांना आणि मान्यवरांना आपल्या संगीताच्या तालावर नाचवलं!

 

 

Pune : पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे – डॉ. राजेश देशमुख

 

‘चौक’ची निर्मिती अनुराधा प्रॉडक्शन्सच्या दिलीप लालासाहेब पाटील यांनी केली असून, प्रोजेक्ट व प्रॉडक्शन हेड महावीर होरे आहेत. तर, चित्रपटाचेलेखन-दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केले आहे. या यापूर्वी देवेंद्र यांनी देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, रेगे, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, हिंदीतील तान्हाजी याचित्रपटांमध्ये परिणामकारक भूमिका साकारली होती. यामुळे आता दिग्दर्शनात ते काय जादू करतात हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. चौक 19 मे रोजी राज्यातील प्रत्येक चौकातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.