Hinjawadi : परपुरुषाशी बोलल्याने विवाहितेला अमानुष मारहाण

एमपीसी न्यूज – परपुरुषासोबत बोलल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेला अमानुषपणे मारहाण केली. तसेच टोचून बोलत  जीवे मारण्याची धमकी दिली.    ही घटना 15 डिसेंबर 2007 ते 15 मे 2020 या कालावधीत सुसगाव येथे घडली.

याप्रकरणी 30 वर्षीय विवाहितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप सुदाम भोते, सुहास सुदाम भोते, पुष्पा सुदाम भोते (सर्व रा. सुसगाव, ता. मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला परपुरुषाशी बोलल्या या कारणावरून आरोपी संदीप याने गॅसच्या पाईपने फिर्यादी यांना अमानुषपणे मारहाण केली. त्यात फिर्यादी यांच्या हातापायावर गंभीर दुखापत झाली.

त्यानंतर आरोपी सुहासच्या फोनवरून फोन करून संदीप याने फिर्यादी महिलेला ‘तुला उभी चिरून टाकू’ अशी धमकी दिली. तसेच आरोपी पुष्पा यांनी वारंवार टोचून बोलून शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.