Pune : कोकीळ परिवाराकडून संत गोरोबाकाका दिंडीचे भवानी पेठेत स्वागत

एमपीसी न्यूज- प्रामुख्याने उस्मानाबादचे वारकरी असलेल्या संत गोरोबाकाका दिंडीची भवानी पेठेत सर्व व्यवस्था करण्याच्या कोकीळ परिवाराच्या परंपरेला 50 वर्षे पूर्ण झाली.

या दिंडीतील दीडशे वारकऱ्यांच्या निवास, भोजन व्यवस्था कोकीळ परिवारातर्फे पाहिली जाते. वारकऱ्यांना पुणे मुक्कामी मिष्टान्नाचे जेवण दिले जाते. 26 आणि 27 जून रोजी या वारकऱ्यांनी कोकीळ परिवाराच्या आतिथ्याचा सलग 50 व्या वर्षी लाभ घेतला. धोंडिबा कोकीळ, जयदीप कोकीळ,गायत्री कोकीळ यांनी स्वागत केले. यावेळी वारकऱ्यांना वारीत उपयोगी पडणाऱ्या दैनंदिन गोष्टींचे किट देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.