Pune : फक्त 200 रुपयांसाठी उगारला कोयता, चतु:शृंगी पोलिसांकडून गंभीर दखल नाही 

एमपीसी न्यूज – पुण्यात कोयता गॅंगचा कहर सुरू असतानाच मागील काही घटनांवरून महिला सुरक्षिततेचा ( Pune ) मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे..सदाशिव पेठेत भरदिवसा तरुणीवर झालेल्या कोयता हल्ल्यानंतर मात्र पुणे पोलीस खडबडून जागे झाले आहेत.

Rahatani : धर्मांतर प्रकरणी तीन महिलांवर गुन्हा दाखल

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी नवीन उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यातील एक म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशनच्या तपास पथक आणि बिट मार्शल कर्मचाऱ्यांना पिस्तुल देण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार शहरातील जवळपास 32 पोलीस ठाण्यातील 70 ते 80 कर्मचाऱ्यांना पिस्तुल देण्यात आले आहेत. पिस्तुल चालवण्याचे प्रशिक्षण देखील त्यांना देण्यात आले आहे.

त्यामुळे आता तरी कोयता गॅंगचा कहर थांबेल असे वाटत असतानाच चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयता गॅंगचा उपद् व्याप   पुन्हा एकदा दिसून आला. किरकोळ अंगकाठी असणाऱ्या दोन तरुणांनी फक्त 200 रुपयांसाठी थेट कोयताच काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या दोन तरुणांनी एका व्यक्तीकडे 200 रुपयांची मागणी केली होती. मात्र त्या व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिल्याने थेट कोयता उगारला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

विशेष म्हणजे इतका गंभीर प्रकार घडूनही चतु:शृंगी पोलिसांनी म्हणावी तशी दखल घेतली नाही. या प्रकरणात कुणीही तक्रार देण्यासाठी समोर आले नाही म्हणून गुन्हा नोंदवण्यात आला नाही.

त्यामुळे चतु:शृंगी पोलीस कोयत्याने वार करत एखाद्याचा खून होण्याची वाट पाहात आहेत का? असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जातोय.

तर दुसरीकडे कोयता गॅंगचा बिमोड करण्यास पुणे पोलीस अपयशी ठरले असेच चित्र सध्या तरी दिसत ( Pune ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.