Rahatani : धर्मांतर प्रकरणी तीन महिलांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडणाऱ्या तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात (Rahatani) आला आहे. ही घटना नखाते वस्ती, रहाटणी येथे घडली.

उषा शिवाजी कांबळे (वय 39, अंकुर कॉलनी, नखाते वस्ती, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra : सप्तशृंगी गड घाटातून एसटी बस थेट 400 फूट दरीत कोसळली; एका महिलेचा मृत्यू तर18 जण जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 दिवसांपूर्वी फिर्यादी उषा कांबळे या नातेवाईक महिलेसोबत घराबाहेर बोलत असताना तीन महिला तिथे आल्या. त्यांनी विचारपुस करुन मी लातुर जिल्हयातील असल्याचे सांगितल्यावर त्यांनीही त्या लातुरच्याच असल्याचे सांगून संवाद साधण्यास सुरुवात केली.

त्यांनी त्यांचेकडील विशिष्ट धर्माची माहिती असणारे पुस्तक वाचून दाखविण्यास सुरवात केली. त्यावेळी उषा यांनी त्यांना मला यातील काही समजत नाही. तुम्ही परत येवू नका असे सांगितले. त्यानंतर त्या तिघी निघून गेल्या.

त्यानंतर 1 जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्या पुन्हा आल्या. त्यांच्याकडील मोबाइल त्यामधील प्रार्थना स्थळाचे फोटो दाखवून, विशिष्ट धर्माची माहिती दिली. मात्र फिर्यादी उषा यांनी तुम्ही हे काय सांगु नका हे आम्हाला कळत नाही. आम्हाला इतर देव देवतांबद्दल सांगा, असे सांगितले. त्या महिलांनी इतर देवतांबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. यापुढे तुम्ही आमचेकडे येऊ नका, असे स्पष्ट सांगून टाकले.

त्यानंतर सोमवारी (दि. 10) रोजी त्या तीन महिला पुन्हा आल्या व फिर्यादी यांच्या संमतीशिवाय घरात घुसल्या. त्यांनी पुन्हा धार्मिक पुस्तक दाखवून तो धर्म माना अशी जबरदस्ती केली. फिर्यादी यांनी त्यांना घरातून बाहेर जाण्यास सांगितले. परंतु त्या बाहेर जात नव्हत्या. फिर्यादी या घरातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनाही बाहेर जाण्यास मनाई केली.

आवाज ऐकून फिर्यादी यांचा भाचा आला असता त्या आरोपी महिलांनी त्यालाही त्या धर्माबाबत सांगण्यास सुरुवात केली. अखेर फिर्यादी यांनी पोलिसांना पाचारण केले. तीन महिलांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत (Rahatani) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.