Pune : ड्रग्ज तस्करी प्रकरणात आरोपी असणाऱ्या ललित पाटीलचे ससून रुग्णालयातून पलायन

एमपीसी न्यूज – ससून रुग्णालयातील ड्रग्ज रॅकेटचा (Pune) म्होरक्या ललित पाटील पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  ललित पाटील हा अमली पदार्थांची तस्करी करणारा अट्टल गुन्हेगार आहे.

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सापळा रचून तब्बल दोन कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले होते. ललित पाटीलचे मोठे (Pune) ड्रग्ज रॅकेटच उघडकीस आले, असते मात्र तो पळून गेल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

दोनच दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील चाकण भागात अमली पदार्थांची तस्करी करताना ललित पाटील याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्याची रवानगी येरव़डामध्ये करण्यात आली होती करण्यात आली.

Pune : पूर्ववैमनस्यातून 2 तरुणांवर प्राणघातक हल्ला

मात्र येरवडा कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने त्याने त्याला पोटाचा विकार झाल्याचा बनाव रचला आणि तीन महिन्यांपूर्वी तो ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाला. कैद्यांसाठी असलेल्या वॉर्ड नंबर 16 मधे त्याला ठेवण्यात आलं. या 16 नंबर वॉर्ड बाहेर पोलिसांचा पहारा असतो.

मात्र ससून रुग्णालयातील कर्मचारी रौफ शेख आणि येरवडा कारागृहात ओळख झालेला सुभाष मंडल यांना हाताशी धरुन ललित पाटीलने ससून रुग्णालयातील कैद्यांच्या वॉर्डमधून ड्रग्ज रॅकेट चालवायला सुरुवात केली.

रविवारी ससून रुग्णालयाच्या गेटवर सुभाष मंडल आणि रौफ शेख यांना दोन (Pune) कोटी रुपयांचे मेफेड्रॉन या अमली पदार्थांसह अटक करण्यात आली. त्यानंतर ललित पाटील याच्यावर नवा गुन्हा दाखल करण्यात आला .

या नव्या गुन्ह्यात ललित पाटीलचा ताबा घेण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांनी सुरु केली होती. मात्र सोमवारी एक्सरे काढण्यासाठी ससूनच्या एक्स रे विभागात पोलीस त्याला घेऊन गेले असताना तो पळून गेला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.