Maval : राऊतवाडी येथील कातकरी बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप 

एमपीसीन्यूज – करुंज ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत राऊतवाडी ( Maval ) येथील वस्तीवरील 25 कातकरी बांधवांना मोफत जातीच्या दाखल्यांचे सोमवारी (दि. 2) वाटप करण्यात आले. आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे.
कातकरी बांधव प्रामुख्याने ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर रहात असल्याने त्यांना शासकीय कार्यालयात जाऊन जातीचा दाखला काढण्याची प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होत नाही. ही अडचण ओळखून आमदार सुनिल शेळके यांनी मागील तीन वर्षांपासून ‘आदिम कातकरी सेवा अभियान’ राबवून तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन कातकरी बांधवांच्या कागदपत्रांचे संकलन करत अर्ज भरुन घेतले.

त्यानंतर टप्प्याटप्याने प्रत्येक गावात जाऊन जातीचे दाखले मोफत वाटप करण्यात येत आहे. कातकरी बांधवांसाठी महत्वाचा असणारा जातीचा दाखला त्यांना घरपोच उपलब्ध झाल्याने कातकरी बांधवांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी आमदार शेळके यांचे स्वीय सहाय्यक सचिन वामन, अशोक राऊत, शाम लोखंडे, संतोष लगड, उमेश लगड, विष्णु लोखंडे, संतोष जाधव, रुपेश सोनुने, नबिलाल आत्तार आदि उपस्थित ( Maval ) होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.