Pune : नव्या महानगरपालिकेसाठी मुख्यमंत्र्यांकडून नागरी संस्थेला आपले मत मांडण्यासाठी पत्र

एमपीसी न्यूज : पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Pune) यांनी शहराच्या हद्दवाढीमुळे शहराच्या सर्वांगीण विकासावर होणाऱ्या विपरीत परिणामाबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच पुणे महानगरपालिकेचे (पीएमसी) विभाजन करण्याचा मुद्दा देखील समोर आला होता. पीएमसीचे पूर्व हडपसर आणि वाघोली परिसरासाठी नवीन महापालिका स्थापन करण्याचा विचार सुरू आहे. आता यावर महाराष्ट्र सरकारने नागरी संस्थेला आपले मत देण्यास सांगितले आहे.

राज्य सरकारने जून 2021 मध्ये विद्यमान शहराच्या हद्दीत 23 नवीन गावांचा समावेश करून PMC हद्द वाढवण्याचा आदेश जारी केल्यानंतर पुणे शहर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे भौगोलिक क्षेत्र असलेले शहर बनले. पीएमसी भौगोलिक क्षेत्र 516 चौरस किमीपर्यंत वाढले आहे. जे बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या 460 चौरस किमीपेक्षा जास्त आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या मागणीनंतर महाराष्ट्र सरकारने गेल्या आठवड्यात उरुळी-देवाची आणि फुरसुंगी ही गावे पीएमसी हद्दीतून वगळून स्वतंत्र नागरी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. सत्ताधारी भाजपने त्यावर भाष्य करणे सध्या टाळले आहे.

D.Ed Course : नव्या शैक्षणिक धोरणानुसार डीएड अभ्यासक्रम बंद होण्याची शक्यता

मात्र, पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पूर्व हडपसर आणि वाघोली या भागाचा योग्य विकास करण्याची गरज असल्याचे सांगून पूर्व हडपसर आणि वाघोलीसाठी दुसरी महापालिका स्थापन करण्याची विनंती केली आहे.

“आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या (Pune) कार्यालयाकडून एक पत्र प्राप्त झाले आहे, ज्यामध्ये पीएमसीचा काही भाग विभाजित करून पूर्व हडपसर आणि वाघोली परिसरासाठी नवीन महापालिका स्थापन करण्याबाबत मत मागवण्यात आले आहे. पीएमसी लवकरच त्यास प्रतिसाद देईल,” असे पीएमसी अधिकाऱ्यानी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.