Pune : उद्या मनोज जरांगे पाटील यांची वाघोली येथे सभा

सभेच्या निमित्ताने नगर रस्त्यावरील वाहतुकीत उद्या मोठा बदल

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Pune) यांची उद्या ( सोमवार 20 नोव्हेंबर 2023) पुण्यात सभा होणार आहे.पुण्यातील वाघोली येथे ही सभा पार पडणार आहे.सभेच्या निमित्ताने नगर रस्त्यावरील वाहतुकीत उद्या मोठा बदल करण्यात येणार आहे.

Maharashtra : ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढविला

उद्या दिवसभर नगर रोडवर जड वाहतुकीस पूर्णपणे बंदी असेल.नगर रस्त्यावरून पुण्यात येणारी सर्व वाहने हडपसरच्या बाजूने वळवण्यात येणार असून हडपसर सासवड कडून साताऱ्या कडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी सोलापूर रोड मार्गाचा वापर करावा.

तसेच शिक्रापूर येथून पुणे शहराकडे येणारी वाहने चाकण भोसरी मार्ग वापरत पुणे मुंबईकडे जातील तर खराडी बायपास वरून जुना पुणे मुंबई रोडवरील वाहने हडपसर मार्गे पुण्यात (Pune) येतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.