Mumbai : वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू व्हावी

एमपीसी न्यूज –  राज्य सरकारने महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया लवकरात (Mumbai) लवकर सुरू करावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्धारे (पॉइंट ऑफ इन्फर्मेशन) काल (मंगळवारी) केली.

Bjp : भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे, पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप

वैद्यकीय शाखेतील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी घेतलेल्या ‘नीट 2023’ परीक्षेचा निकाल जाहीर होऊन महिना उलटला असून, महाराष्ट्रामध्ये अद्याप प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही.

त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढलेली आहे याकडे आमदार शिरोळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

देशातील इतर राज्यांमध्ये प्रवेशप्रक्रियेने गती घेतली असून, अनेक ठिकाणी अर्ज प्रक्रिया पूर्णत्वाकडे देखील गेलेली आहे.

गुजरातमध्ये अर्जासाठी 24 जुलै, कर्नाटकला 21 जुलै, पंजाबला 21 जुलै, अरुणाचल प्रदेश येथे 18 जुलै आणि तमिळनाडू येथे अर्जाची मुदत 10 जुलै अशी ठेवण्यात आली, अशी माहितीही आमदार शिरोळे यांनी सभागृहासमोर (Mumbai) ठेवली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.