Pune : हत्यारांचा धाक दाखवत 1 लाख 34 हजारांची केली चोरी

एमपीसी न्यूज – रात्री तीन ते चारच्या सुमारास अचानक घरात चोर शिरले.  ५५ हजार रुपये रोख आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांसह ऐवज चोरीला गेला आहे.

Talegaon : बांधकाम साइटवरून सेंट्रींग मटेरियल चोरीला

शेवाळेवाडी मांजरी पुणे येथील कोद्रेनगरमध्ये हा चोरीचा प्रकार घडला असून, पिडीत कुटुंब कोद्रेनगर येथे भाड्याच्या बंगल्यात राहत होते. अज्ञात तीन चोर आपसात संगनमत करून चोरीच्या स्थळी पोहचले. ग्रीलच्या सहाय्याने स्लायडिंग विंडो उचकटून बंगल्याच्या आत प्रवेश केला. आवाज आल्याने घरातील लोक जागे झाले.

फिर्यादी व त्यांचे आई वडील यांना चोरांनी हत्त्यारांचे धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. अंगावरील दागिने हिसकावताना आईच्या हाताला दुखापत केली. तसेच घरातील ५५ हजार रुपये रोख व सोन्याचांदीचे दागिने असे एकूण 1 लाख ३४ हजार ७५० रुपयांचा ऐवज जबरदस्ती चोरून नेला. याबाबत अज्ञात चोरट्यां विरोधात हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे हे करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.