Pune : पुणे – नाशिक भुसावळ रेल्वे बंद; प्रवाशांची गैरसोय

एमपीसी न्यूज : पुणे- नाशिक-भुसावळ एक्स्प्रेस गेल्या (Pune) नऊ महिन्यांपासून बंद असल्यामुळे पुणे ते नाशिक रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. या प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असून त्यांची ओढाताण होत आहे. त्यामुळे ही रेल्वे पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. 

पुणे भुसावळ ही रेल्वे पुणे, पनवेल, इगतपुरी, कसारा घाटामार्गे नाशिक, (Pune) भुसावळ या मार्गे सुरू होती. प्रवाशांच्या सोयीची असल्यामुळे रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद होता. कर्जत स्थानकाच्या रिमोडेलिंगच्या कामामुळे ही रेल्वे प्रशासनाने जानेवारी 2023 पासून पुढील तीन महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद केली.

परंतु, नंतर घाट विभागात काम सुरू केल्यामुळे ही रेल्वे परत 31 मार्चपासून पुन्हा अनिश्चित काळासाठी बंद केली गेली.

PCMC : अर्जाच्या रकान्यात आता तृतीयपंथीयांनाही स्थान

आता इगतपुरी ते भुसावळदरम्यान डेमू रेल्वे चालवली जात असून या गाडीचा पुण्यातून नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांना काही फायदा होत नाही. येथील प्रवाश्यांना एसटीचा वापर करावा लागत आहे. पुणे-नाशिक रस्त्याच्या रुंदीकरणाची कामे पुणे जिल्ह्यात सुरू असून प्रवाशांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते आहे. त्यामुळे ही गाडी लवकर सुरू करण्याची मागणी प्रवाशी करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.