Pune crime News : पुण्यातील नॅशनल हॉर्स रायडर अल्पवयीन मुलीची अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

एमपीसी न्यूज – पुण्यातील नांदेड सिटी परिसरात राहणाऱ्या नॅशनल हॉर्स रायडर अल्पवयीन मुलीने अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. श्रिया गुणेश पुरंदरे (वय 17) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, श्रियाला दहावीत तब्बल 95 टक्के गुण मिळाले होते. सध्या ती बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नांदेड सिटी मधुवंती सोसायटीत राहणाऱ्या अभिजीत देशमुख यांना काहीतरी जोरात खाली पडल्याचा आवाज आला. त्यानंतर त्यांनी खाली पाहिले असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली श्रिया त्यांना दिसली.

त्यानंतर सोसायटीतील नागरिकांनी तातडीने तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीअंती तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर हवेली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.